Homeबॅक पेजआता शिळफाटा चौकातला...

आता शिळफाटा चौकातला प्रवास होणार वेगवान

ह. भ. प. संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्गावरून कल्याण, डोंबिवली ते ठाणे, नवी मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. या मार्गावरील शिळफाटा येथील उड्डाणपुलाच्या आणखी तीन मार्गिका नुकत्याच खुल्या करण्यात आल्या आहेत. या मार्गिकांमुळे शिळफाटा चौकातला प्रवास अधिक वेगवान झाला आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुरातून ठाणे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ठाणे, नवी मुंबईला जाण्यासाठी ह. भ. प. संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मागील वर्षी या रस्त्याचे सहा पदरीकरण करून येथील वाहनचालकांना दिलासा देण्यात आला होता.

शिळफाटा

या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी पुढील टप्पा असलेल्या मुंब्रा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८वरील शिळफाटा जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या सहा पदरी उड्डाणपुलाच्या उर्वरित सहा मार्गिका आता खुल्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका खुल्या करण्यात आल्या होत्या. त्यावरून दोन्ही बाजूंची वाहतूक होत होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या उड्डाणपुलामुळे बदलापूर ते डोंबिवली येथून कल्याण शीळमार्गे ठाणे आणि नवी मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार असून अधिक वेगवान प्रवास करता येणार आहे. यामुळे वाहनचालकांच्या वेळेची आणि इंधनाचीही बचत होणार आहे.

शीळफाटा सहापदरी उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये:

– एमएमआरडीएच्या माध्यमातून ११९ कोटी रुपयांच्या निधीतून पुलाची या पुलाची उभारणी करण्यात आली आहे.

– ७४० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद असा हा उड्डाणपूल आहे.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content