Homeबॅक पेजआता गॅल्‍गोटियास युनिव्‍हर्सिटीचे...

आता गॅल्‍गोटियास युनिव्‍हर्सिटीचे अभ्यासक्रम होणार सुलभ

कुहू, या भारतातील अग्रगण्‍य ऑनलाईन स्‍टुडण्‍ट लोन व्‍यासपीठाने देशातील प्रमुख शैक्षणिक संस्‍था गॅल्‍गोटियास युनिव्‍हर्सिटीसोबत उल्‍लेखनीय सहयोगाची घोषणा नुकतीच केली. या सहयोगाचा कुहूचे प्रगत तंत्रज्ञान आणि लेंडर्सच्‍या (कर्जदाते) नेटवर्कचा फायदा घेत देशभरातील गॅल्‍गोटियास युनिव्‍ह‍िर्सिटी विद्यार्थ्‍यांना किफायतशीर आर्थिक पर्याय उपलब्‍ध करून देण्‍याचा त्यांचा प्रयत्न आहे.

कुहू शिक्षणाकरिता वित्तपुरवठा करणारी विश्‍वसनीय फॅसिलिटेटर म्हणून उदयास आले आहे, ज्यांच्याशी भारतातील ३००हून अधिक प्रतिष्ठित संस्‍थांसोबत सहयोग आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून गॅल्‍गोटियास युनिव्‍हर्सिटीचे विद्यार्थी अनेक फायद्यांचा आनंद घेऊ शकतील, ज्‍यामुळे कर्जसंपादन प्रक्रिया सुलभ व सुव्‍यवस्थित होईल. याचा मुख्‍य फायदा म्‍हणजे कुहूसह सिंगल ऑनलाईन अॅप्‍लिकेशनच्‍या माध्‍यमातून बँका व एनबीएफसी यासह १०हून अधिक लेंडर्सकडून कर्जउत्‍पादनांची व्‍यापक श्रेणी उपलब्‍ध होईल. हे एक-थांबा सोल्‍यूशन विद्यार्थ्‍यांना विविध पर्यायांचा शोध घेण्‍यासोबत त्‍यांची तुलना करण्‍यास तसेच व्‍याजदर, परतावा मुदत आणि कर्जाची रक्‍कम यानुसार सर्वोत्तम कर्जाची निवड करण्‍यास सक्षम करते.

गॅल्‍गोटियास

कुहूचे प्रगत अल्‍गोरिदम्‍स विद्यार्थ्‍यांना वैयक्तिकृत लोन ऑफर्स देतील, ज्‍या त्‍यांच्‍या शैक्षणिक गरजा व आर्थिक स्थितींना अनुसरून असतील आणि सर्वोत्तम कर्ज अनुभवाची खात्री देतील. व्‍यासपीठाचे युजर-अनुकूल इंटरफेस आणि सुव्‍यवस्थित ऑनलाईन अर्जप्रक्रिया प्रशासकीय ताण मोठ्या प्रमाणात कमी करतील. डॉक्युमेंट सबमिशन आणि मान्‍यता प्रक्रियांमध्‍ये सुलभता आणतील.

कुहूचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रशांत भोसले म्‍हणाले की, आम्‍हाला दर्जेदार शिक्षण सर्वांना उपलब्‍ध करून देण्‍याचा आमच्‍यासारखाच दृष्टिकोन असलेली प्रतिष्ठित संस्‍था गॅल्‍गोटियास युनिव्‍हर्सिटीसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगामधून भारतीय विद्यार्थ्‍यांना आर्थिक समस्‍यांबाबत चिंता न करता त्‍यांच्‍या आवडीचा कोर्स करण्‍यासाठी आवश्‍यक असलेले सर्वोत्तम स्‍टुडण्‍ट लोन्‍स प्रदान करत आत्‍मनिर्भर करण्‍याप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते.   

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content