Homeटॉप स्टोरीआता शिवसेनेच्या शाखा-शाखांमध्ये...

आता शिवसेनेच्या शाखा-शाखांमध्ये रंगणार चिन्हावरुन सामना!


आता चिन्हावरुन पुन्हा महाभारत होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना आणि शिवसेनेचा ठाकरे गट यानिमित्ताने आमने-सामने आले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईसह राज्यात पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्यात नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशानंतर हा सामना सुरू झाल्याचे बोलले जाते.

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशानंतर ठाकरे गटातील पदाधिकारी आपापल्या भागातील पोस्टर्स, बॅनर तसेच शाखांबाहेर लावलेल्या बोर्डांवरील धनुष्यबाण चिन्हं काढायच्या कामाला लागले आहेत. परंतु यावरून शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. मुंबईतल्या प्रभादेवी भागात अशीच परिस्थिती झाली आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला एका लोखंडी बोर्डावर तिथे असलेले धनुष्यबाणाचे चिन्ह काढत असताना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मारल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. ठाकरे गट आणि शिवसेनेकडून याबद्दल एकमेकांविरोधात दादर पोलिसठाण्यात तक्रार दिली.

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतून हे लोखंडी पोस्टर लावले असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून खोडसाळपणा केल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई आणि पुणे येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्याला भागात जिथे जिथे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आहे ते काढा आणि मशाल चिन्ह लावा असे आदेश दिले होते. त्यानुसार ठाकरे गटाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. यापूर्वीपण शाखांवरुन दोन्ही बाजूचे पदाधिकारी परस्परांशी भिडल्याचे राज्याने पाहिले आहे. खास करुन ठाणे, मुंबईत हा प्रकार घडला होता.

पुण्याच्या सभेत ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी अत्यंत जहाल भाषेचा वापर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पण तिखट प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह गेले तर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळाले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content