क्लीअरटॅक्स या भारतातील आघाडीच्या ऑनलाईन टॅक्स-फाइलिंग प्लॅटफॉर्मने त्यांच्या उल्लेखनीय व्हॉट्सअॅप आधारित इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्यूशनच्या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्पन्न ब्ल्यू-कॉलर व्यक्तींसाठी आयकर भरण्याची सुविधा सोपी करण्याचा मानस आहे, जे अनेकदा फाइलिंग प्रक्रियेमधील गुंतागुंतींमुळे कर परतावे चुकवतात.
नवीन सोल्यूशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षमतांचा वापर करत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विनासायास, चॅटआधारित अनुभव देते, जे अनेक वापरकर्त्यांना सहजपणे उपलब्ध होतात. सध्या आयटीआर १ आणि आयटीआर ४ फॉर्म्ससह ही सेवा बहुतांश कमी-उत्पन्न असलेल्या करदात्यांच्या गरजांची पूर्तता करते. भारतात विविध भाषा बोलल्या जात असल्यामुळे क्लीअरटॅक्स इंग्रजी, हिंदी व कन्नडसह १० भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे अधिक पोहोच व उपयुक्ततेची खात्री मिळते.
क्लीअरटॅक्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले की, आमचे व्हॉट्सअॅप सोल्यूशन कर अनुपालनामधील महत्त्वपूर्ण पोकळीला दूर करते, ज्याचा भारतातील कर्मचारीवर्गाला दीर्घकाळापासून सामना करावा लागत होता. आम्ही कर भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासोबत आर्थिक सक्षमीकरणाला चालनादेखील देत आहोत. आम्ही भारताला आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी
करत आहोत. व्हॉट्सअॅपवर ही सेवा सुरू करून आम्ही व्यक्तींना भेटत आहोत, जिथे ते तंत्रज्ञानामधील अडथळ्यांना दूर करत आहेत. त्यामुळे लाखो मेहनती भारतीय त्यांच्या फोन्सवरील काही क्लिक्ससह योग्य परताव्यांसाठी क्लेम्स करू शकतात. ही सेवा सोयीसुविधेसोबत आर्थिक साह्य व समावेशनाची खात्री देते. आम्हाला कर भरण्याच्या या परिवर्तनात्मक दृष्टिकोनामध्ये अग्रस्थानी असण्याचा अभिमान वाटतो. ही सेवा गरजूंना आवश्यक असलेले आर्थिक साह्य उपलब्ध करून देते.
प्लॅटफॉर्ममध्ये विश्वसनीय पेमेंट इंटीग्रेशन सिस्टमचादेखील समावेश आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना प्रचलित व्हॉट्सअॅप इंटरफेसमध्ये फाइलिंगपासून पेमेंटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येते. वापरकर्ते इमेजेस्, ऑडिओ आणि टेक्स्टच्या माध्यमातून सहजपणे आवश्यक माहिती गोळा करण्यासह सबमिट करू शकतात, ज्यामधून सुव्यवस्थित डेटा कलेक्शन प्रक्रियेची खात्री मिळते. एआय बॉटला प्रगत लँग्वेज मॉडेल्सचे पाठबळ आहे. त्यामुळे त्वरित मदत मिळण्यासोबत वापरकर्त्यांना प्रक्रियेच्या प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन मिळते. तसेच, एआय-पॉवर्ड सिस्टम प्रत्येक वापरकर्त्यासाठी सर्वात फायदेशीर करव्यवस्थेची आपोआपपणे निवड करते, ज्यामुळे संभाव्य बचत वाढते.
ही सेवा विशेषत: ब्ल्यू-कॉलर कर्मचाऱ्यांसह ड्रायव्हर्स, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह्ज, होम सर्विस प्रदाते यांच्यासाठी फायदेशीर आहे. व्हॉट्सअॅपची व्यापक लोकप्रियता व वापराचा फायदा घेत क्लीअरटॅक्स कर भरण्याची सुविधा अधिक सोपी आणि युजरअनुकूल करत आहे.