Homeचिट चॅटदेशभरात आता एकाच...

देशभरात आता एकाच पद्धतीचे पीयूसी प्रमाणपत्र!

केंद्रीय रस्ते वाहतूक अणि महामार्ग मंत्रालयाने, केंद्रीय मोटार वाहन अधिनियमांतर्गत देशभरात एकाच सामाईक पद्धतीने पीयूसी म्हणजेच प्रदूषण नियंत्रणात असल्याविषयीचे प्रमाणपत्र जारी करण्याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे.

प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याच्या प्रमाणपत्राची (PUCC) ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

(a) देशभरात एक सामाईक पियूसी प्रमाणपत्र जारी करण्याच्या पद्धतीची सुरुवात आणि पीयुसी डेटाबेस राष्ट्रीय नोंदणीपटाशी संलग्न करणे.

(b) पहिल्यांदाच यात रिजेक्शन स्लीप म्हणजे प्रमाणपत्र नामंजूर करण्याची व्यवस्था देण्यात आली आहे. यासाठीचा एक सामाईक फॉरमॅट देण्यात आला असून चाचणीसाठी आलेले वाहन उत्सर्जनाच्या प्रदूषणविषयक नियमांची पूर्तता करत नसेल, तर वाहनमालकाला पीयूसी देण्यास नकार दिला जाईल. हे नामंजूर पत्र, वाहनधारक वाहनसेवा केंद्रात दाखवू शकेल. तिथे वाहनाची सर्विसिंग करुन घेऊ शकेल किंवा जर PUCC केंद्रातील उपकरण बिघडले असेल तर वाहनधारक दुसऱ्या केंद्रात, ही चाचणी करुन घेण्यासाठी या कागदांचा वापर करू शकतील.

(c) या चाचणीदरम्यान, पुढील माहिती गुप्त ठेवली जाईल-

1) वाहनमालकाचा मोबाईल क्रमांक, नाव आणि पत्ता.

2) इंजिन क्रमांक आणि चासीस क्रमांक (केवळ शेवटचे चार अंक दिसू शकतील, इतर सर्व अंक झाकलेले असतील)

(d) वाहनमालकाचा मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले असून त्याच क्रमांकावर प्रमाणीकरण आणि शुल्काविषयीचा एसएमएस पाठवला जाईल. 

(e) जर संबंधित वाहन कार्बन उत्सर्जनविषयक नियमांची पूर्तता करत नसल्याचे, अंमलबजावणी अधिकाऱ्यांना जाणवले, तर ते अधिकारी, लिखित अथवा डिजिटल स्वरूपात वाहनधारकांशी संपर्क करून, चालकाला/धारकाला संबंधित वाहन चाचणीसाठी एखाद्या अधिकृत पीयूसी केंद्राकडे घेऊन जाण्यास सांगू शकतात. जर चालक किंवा वाहनधारकाने ही चाचणी केली नाही, तर त्यांना दंड आकाराला जाऊ शकतो.

(f) जर वाहनमालक या निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले, तर वाहनाची नोंदणी करणारे अधिकारी, निश्चित कारण लिखित स्वरूपात देऊन, संबंधित वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच परवाना रद्द करू शकतात. जोपर्यंत असे पीयूसी प्रमाणपत्र वाहनमालकाला मिळत नाही, तोपर्यंत गाडीची नोंदणी रद्द केली जाऊ शकते.

(g) म्हणजेच, या अधिनियमाची अंमलबजावणी आयटी-अंतर्गत होणार असून त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या वाहनांच्या वापरावर चाप बसू शकेल.

(h) या फॉर्मवर एक QR कोडदेखील असेल. यात पियूसी केंद्राविषयीची सर्व माहिती असेल.

Continue reading

वसुबारस आणि भाऊबीज नाहीत दीपावलीचे भाग!

दीपावली हा प्रकाशाचा उत्सव! अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला...

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...
Skip to content