Friday, November 8, 2024
Homeहेल्थ इज वेल्थआता गरजूंनी 'जितो'कडून...

आता गरजूंनी ‘जितो’कडून न्या ऑक्सिजन भाड्यावर!

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जितो, या संघटनेच्या गोरेगाव विभागाने मुंबईतल्या जोगेश्वरी ते दहीसर या परिसरातल्या ऑक्सिजनची गरज असलेल्या रूग्णांसाठी नाममात्र भाड्याने ऑक्सिजनची सेवा सुरू केली आहे.

कोरोनाग्रस्तांना अनेकदा श्वसनाचा त्रास होतो आणि त्यांना ऑक्सिजनची गरज भासते. परंतु अनेकदा रूग्णांना रूग्णालयात ऑक्सिजनचा बेड मिळू शकत नाही. अशावेळी त्यांना घरच्या घरीच उपचार घ्यावे लागतात. अशा रूग्णांसाठी जितोच्या गोरेगाव विभागाने ही योजना हाती घेतली आहे. यामध्ये संघटनेकडून रूग्णासाठी पाच लीटरच्या ऑक्सिजनचे मशीन पुरवले जाईल.

यासाठी पहिल्या सहा दिवसांसाठी दररोज १०० रूपये याप्रमाणे भाडे घेतले जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाकरीता दरदिवशी ५०० रूपये भाडे आकारले जाईल. जास्तीतजास्त १४ दिवसांपर्यंत हे मशीन वापरता येईल. १५व्या दिवशी ते संघटनेच्या कार्यालयात पुन्हा जमा करणे बंधनकारक राहील. याकरीता संघटनेकडून प्रत्येकी पाच हजार रूपये अनामत रक्कम म्हणून ठेवली जाईल. संघटनेच्या कोणातरी सदस्याने या रूग्णाला ऑक्सिजनचे मशीन पुरविण्याची शिफारस देणे बंधनकारक करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ९००४५१५१११, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे गोरेगाव विभागाचे अध्यक्ष कीर्ती कांथेर, मुख्य सचिव पंकज लोढा, सहसचिव रौनक शाह आणि खजिनदार कविता शाह यांनी केले आहे. गरजूंना आपली मागणी ऑनलाईन फॉर्म भरूनही नोंदविता येईल. यासाठी https://forms.gle/LYxTefarzQG7KbE67 येथे संपर्क साधावा.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content