Monday, December 23, 2024
Homeमाय व्हॉईसदिशा मृत्यू प्रकरणात...

दिशा मृत्यू प्रकरणात अब होगा न्याय!

अभिनेता सुशांतिंसह राजपूत आणि त्याची माजी पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन यांचा संशयास्पद, गूढ मृत्यू झाला. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप त्यावेळी होऊ लागला होता. जेव्हा त्या इमारतीचे सीसीटीव्ही चित्रिकरण गहाळ झाल्याचे समोर आले; सोबतच तिचं लग्न जुळलेला, होणारा नवरा अचानक गायब झाला, तेव्हा मात्र या आरोपांवर सर्वसामान्यांचा संशय अधिक बळावला गेला. त्यावेळी सरकार महाविकास आघाडीचे होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यामुळे हे प्रकरण राजकीय दबावाने दाबले गेल्याची आवई उठणे स्वाभाविकच होते.

महाराष्ट्र पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्त्येचा निष्कर्ष काढून आपल्याकडून बंद करण्यात केलेली घाईदेखील याला काही प्रमाणात कारणीभूत आहेच. अशा सगळ्यामध्ये 2020पासून दोन व्यक्ती अशा आहेत, ज्या सातत्याने पोटतिडकीने, दाव्याने सांगत आहेत की, सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांची आत्महत्त्या नसून खून आहे. आपल्याकडे पुरावा आहे. तपासयंत्रणांनी आपल्याकडे मागितला तर आपण देऊ… हे सांगणारी बाप-लेकाची जोडी म्हणजे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे होय. आता हे दोघे कमी होते म्हणून की काय? तर, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे मैदानात उतरलेत. हा प्रश्न थेट लोकसभेत लावून धरलाय त्यांनी. मग काय त्याचेच पडसाद राज्याच्या विधिमंडळात उमटले. पुन्हा नितेश राणेंनी हा विषय प्रचंड आक्रमकपणे विधानसभेत लावून धरला. एकामागून एक सदस्यांनी दिशाला न्याय देण्याची मागणी लावून धरली. शेवटी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची पुन्हा विशेष तपास पथकाच्या माध्यमातून तपास करण्याची घोषणा विधानसभेत केली. आणि त्याचबरोबर ‘अब होगा न्याय…’ अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या…

तसं तर या प्रकरणावरून नारायण राणे आणि नितेश राणे यांनी मागील दोन वर्षांपासून ठाकरे कुटुंबाला चांगलेच बेजार केले आहे. सुशांतसिंह आणि दिशा प्रकरणाचे शुक्लकाष्ठ ठाकरे कुटुंबाचे सुटता सुटत नाही आहे. त्यामुळेच की काय, ठाकरे कुटूंब असेल किंवा ठाकरे गटाचे नेते असतील नुसते सैरभैर झाल्याचे दिसत आहे. युवराज तर बेताल वक्तव्य करताना दिसत आहेत. राज्याचे मुख्यमंत्रिपद हे एक संवैधानिकपद असताना मुख्यमंत्र्यांविषयी जी भाषा सध्या युवराज वापरत आहेत, त्यावरून युवराजांचे खरंच मानसिक संतुलन बिघडले असल्याचेच लक्षण दिसते. एकीकडे हेच युवराज ट्विट करून सांगतात, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही म्हणून; दुसरीकडे नारायण राणेंना बंगल्यावरून फोन येतात, तुम्हालाही मुलंबाळं आहेत; आता प्रकरण थांबवा म्हणून. तिसरीकडे इमारतीखाली मंत्र्याचे सुरक्षारक्षक पहारा देत असतात. इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडे असलेल्या आवक-जावक नोंदवहीची पानं फाडलेली असतात, तर, रात्री काळ्या मर्सिडीजमधून दिशाला घरी सोडण्यात आले नेमकी तशीच गाडी सचिन वाझे नावाच्या पूर्वाश्रमीच्या यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडेदेखील असते.

राणेंची महिला आयोगात तक्रार करायला महापौर किशोरी पेडणेकर धावतात. महिला आयोग मालवणी पोलिसात तक्रार दाखल करायला सरसावते (जे महिला आयोग धनंजय मुंडे प्रकरणातील तक्रारीवर मूग गिळून बसते). लोकसभेत आपल्या नेत्यावर गंडांतर आणलं म्हणून, मनीषा कायंदे नावाच्या ठाकरे गटाच्या सध्याच्या इमानदार नेत्या, विधान परिषदेच्या सदस्य, लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार्‍या सदस्याची चौकशीची मागणी विधान परिषदेत करतात तर, विधान परिषदेचे सभापतिपद रिक्त असल्याने सध्या उपसभापती असलेल्या ठाकरे गटाच्या ठाकरे कुटुंबाचं मीठ खात असलेल्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सभागृहाचे कामकाज चालवत असल्याचा फायदा घेत तातडीने एसआयटीद्वारे चौकशी करण्याचे, महत्त्वाचे म्हणजे जे प्रकरण यांच्या सत्ताकाळात पोलिसात दाखल झाले, त्या प्रकरणाची चौकशी या सरकारने करण्याचे निर्देश देतात.

वास्तविक पाहता त्याचवेळी तपास होणे अपेक्षित होते. प्रकरण एवढं गंभीर होतं तर आपण आपल्या सत्ताकाळात याचा तपास का केला नाही, याचा जाब विचारला पाहिजे. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार, महाविकास आघाडीच्या काळातले उपमुख्यमंत्री. ज्यांच्या सत्ताकाळात प्रकरण घडलं आणि तपास झाला ते अजितदादा ऑन रेकॉर्ड प्रकरण सीबीआयकडे चौकशीला होतं आणि त्यांनी क्लीन चिट दिल्याची तद्दन खोटी माहिती विधानसभा सभागृहाला देतात. अजित पवारांसारख्या सभागृहातील ज्येष्ठ नेत्याकडून अशा वर्तणुकीची अपेक्षा नाही. गुरुवारी जयंत पाटलांच्या निलंबनानंतर ते आपल्या ज्येष्ठत्वाची ग्वाही देताना सभागृहातील आपल्या वर्तणुकीचा उदो उदो करताना दिसले होते. या सगळ्याचं तात्पर्य एकच की, ही मंडळी आता नुसती सैरभैर झालेली आहेत. का तारतम्य राहिलं नाही यांना? असं काय करून बसलेत हे की, आता काही केल्या यांचा पिच्छा सुटताना दिसत नाही?

दिशा-सुशांत मृत्यूचा एकमेकांशी काही संबंध नाही, दिशा गर्भवती नव्हती, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नाही, दिशा सुशांतिंसहची मॅनेजरदेखील नव्हती आणि त्या रात्री कोणती पार्टीसुद्धा नव्हती, तिचे राजकीय काही संबंध नव्हते आणि तिने आत्महत्त्याच केली… या सार्‍या गोष्टींचा निष्कर्ष अल्प कालावधीत लावणार्‍या पोलिसांना मात्र दिशाने आत्महत्त्याच केली तर ती कोणत्या कारणाने केली, याचा तपास लावता आला नाही, हे विशेष…

काहीही असो, पण राणे पिता-पुत्राचं कौतुकच म्हणावं लागेल. दोघांचीही तोंडं बंद करण्यासाठी राजकीय दबाव आणि पदाचा गैरवापर करून केंद्रीय मंत्री असताना, नारायण राणेंवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले. दिशा प्रकरणात तर दिवसभर पोलिस ठाण्यात बसवून त्यांची चौकशी करीत असल्याचे नाटक करण्यात आले. तर, दुसर्‍या अदखलपात्र गुन्ह्यात जेवण करताना अटक करण्यात आली. कोठडीत डांबण्याचा प्रयत्न होता, पण तो विफल झाला. दुसरीकडे त्यांचे पुत्र आमदार नितेश राणेंविरोधात संतोष परब हल्ला प्रकरणात आटक करण्यात आले. या प्रकरणात नितेश राणेंना तुरुंगातही राहावे लागले. राणेंच्या बंगल्यावर बुलडोजर चालविण्याची व्यवस्था केली. हे सगळं कशासाठी तर राणे पितापुत्रांनी आपलं तोंड बंद ठेवावं, एवढाच काय तो उद्देश होता. तरीदेखील हे पिता-पुत्र डगमगले नाहीत. ना ही झुकले… आता पुन्हा एकदा दोघांनी रणिंशग फुंकले आहे.

फडणवीसांनी आवाहन केल्याप्रमाणे काही नवीन पुरावे असतील तर द्या; एसआयटीमार्फत चौकशी होईल. आता पुरावे येतील समोर… आता कोणी पानं फाडली… कोणी सीसीटीव्ही फूटेज गहाळ केलं… कोणी पुरावे नष्ट करण्याचा घाट घातला… कोणाला वाचविण्यासाठी हा सगळा आटापिटा केला गेला… अंबानीच्या घरासमोर ठेवलेल्या स्फोटकांचे पुरावे नष्ट करणारा वाझे जसा समोर आला… तसाच या प्रकरणातील वाझेदेखील समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Continue reading

निर्लज्जम् सदा सुखी!

अलिकडेच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात ‘लंगोटी पेपर’ असा उल्लेख केला होता. त्याच लंगोटी पेपरच्या एका उपकृत पदावर असलेला विश्‍वप्रवक्ता म्हणतो, महाराष्ट्रातील राजकारणातून नैतिकतेचे अधःपतन झाले आहे. पंजाबात फौजासिंग नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देतो आणि...

…. म्हणे महाराष्ट्र थंड का?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय्... तरीही महाराष्ट्र अजूनही थंड का? असा सवाल आता काही तथाकथित आघाडीचे पुरोगामी, सेक्युलर आणि महाराष्ट्राचे स्वयंघोषित ठेकेदार करताना दिसत आहेत. बरोबरही आहे त्यांचं. महाराज हे महाराष्ट्राचे...

‘सामान्य शिवसैनिक’ झाला मुख्यमंत्री, आता महिलेला ‘मुख्यमंत्री’पद!

शाहू-फुले-आंबेडकरांची गौरवशाली परंपरा सांगणार्‍या, सावित्रीबाईंची आरती ओवाळणार्‍या, राजमाता जिजाऊंचे पोवाडे गाणार्‍या, महाराणी ताराबाई, अहल्यादेवींची महती सांगणार्‍या, बहिणाबाई, रमाबाई, आनंदीबाईंच्या या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६२ वर्षे उलटली तरी अजून या राज्यात एकही महिला मुख्यमंत्री का होऊ शकलेली नाही? हा खरा...
Skip to content