Homeचिट चॅटआता पेटीएमच्या माध्यमातून...

आता पेटीएमच्या माध्यमातून मिळवा डिजिटल गोल्ड

एमएसएमईज व एंटरप्राइजेससाठी भारतात अग्रगण्य असलेल्या मर्चंट पेमेंट्स लीडर आणि फायनान्शियल सर्व्हिसेस वितरण कंपनी, पेटीएमने ‘गोल्ड काॅइन इनिशिएटिव्ह’ची नुकतीच घोषणा केली आहे. हा नवा उपक्रम प्रत्येक व्यवहाराला दीर्घकालीन बचतीची संधी बनवतो. ग्राहकांना प्रत्येक पेमेंटवर गोल्ड कॉइन मिळतील, जे ते सहजपणे डिजिटल गोल्डमध्ये रूपांतरित करू शकतात.

कोठे मिळतील गोल्ड कॉइन?

स्कॅन अँड पे, ऑनलाइन खरेदी, मनी ट्रान्सफर, रिचार्ज, बिल पेमेंट्स आणि ऑटो/रिकरिंग पेमेंट्स यांसारख्या व्यवहारांवर गोल्ड कॉइन मिळतील. युपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंगद्वारे केलेले सर्व पेमेंट्स याकरीता पात्र असतील. विशेष म्हणजे, क्रेडिट कार्ड किंवा रूपे क्रेडिट कार्डद्वारे युपीआय पेमेंट केल्यास दुप्पट गोल्ड कॉइन मिळतील. प्रत्येक व्यवहारावर १% गोल्ड कॉइन मिळतील. जमा झालेले १०० गोल्ड कॉइन = १ रुपया मूल्याच्या डिजिटल गोल्डमध्ये रुपांतरित करता येतात. अशाप्रकारे कुटुंबे आणि व्यवसाय दोन्ही सहजपणे बचत करू शकतात. रिडेम्प्शन प्रक्रिया सोपी असून उपभोक्त्याला अतिरिक्त सोनं खरेदी करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.

पेटीएम गोल्ड कॉइन डिजिटल गोल्डमध्ये कसे रूपांतरित करावे?

पेटीएम अॅप उघडा आणि होम स्क्रीनवरील ‘गोल्ड कॉइन’ विजेटवर टॅप करा.

तुमचा गोल्ड कॉइन बॅलन्स पाहा.

बॅलन्स १,५०० कॉइनपर्यंत पोहोचल्यावर ‘कन्व्हर्ट टू डिजिटल गोल्ड’ हा पर्याय सक्रिय होईल.

त्यावर टॅप करून गोल्ड कॉइनचे डिजिटल गोल्डमध्ये सहज रूपांतर करा (१०० गोल्ड कॉइन = १ रुपया मूल्याचे डिजिटल गोल्ड).

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content