Wednesday, February 5, 2025
Homeएनसर्कलमोबाईलप्रमाणे आता गॅस...

मोबाईलप्रमाणे आता गॅस रिफिल बुकिंगची पोर्टेबिलिटी!

मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरप्रमाणे आता एलपीजी ग्राहकांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आणि सर्वांना परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून, एलपीजी ग्राहकांना कोणत्या वितरकांकडून एलपीजी सिलिंडर (कुकिंग गॅस) पुन्हा भरून हवा आहे याची निवड ग्राहकांनी करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.

तेल विपणन कंपनी (ओएमसी)मधील पत्त्यासह असलेल्या वितरकांच्या यादीमधून ग्राहकांना त्यांचा “वितरण वितरक” निवडता येईल. प्रायोगिक तत्त्वावर लवकरच चंडीगढ, कोयम्बतूर, गुडगाव, पुणे आणि रांची येथे ही अनोखी सुविधा उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत लॉग इन वापरुन मोबाईल अ‍ॅप / ग्राहक पोर्टलवर एलपीजी सिलिंडर पुन्हा भरून घेण्यासाठी नोंदणी करताना वितरणाच्या वितरकांची यादी त्यांच्या कामगिरी क्रमवारीसह दर्शविली जाईल.

ModeIndaneBharat GasHPGas
Portal and Mobile App: Customers can book refill, update personal records, apply for portability, transfer of connection, address change and all other refill related services.https://cx.indianoil.in and IndianOil One mobile apphttps://my.ebharatgas.com and Hello BPCL mobile apphttps://myhpgas.in and HP Pay mobile app 
Refill Booking through IVRS and SMS number: 77189 555557715012345 / 7718012345List of state wise telephone numbers- https://www.hindustanpetroleum.com/hpanytime
Refill Booking through Missed Call84549 5555577109555559493602222
WhatsApp75888 8882418002243449222201122

डिजिटल एलपीजी सेवा

या डिजिटल व्यवस्थेव्यतिरिक्त, ग्राहक उमंग (युनिफाइड मोबाइल अॅप फॉर न्यू गव्हर्नन्स) अ‍ॅप किंवा भारत बिल पे सिस्टम अ‍ॅप्स आणि मंचाद्वारे त्यांचे एलपीजी सिलिंडर भरून घेण्यासाठी नोंदणी करू शकतात. याव्यतिरिक्त ग्राहक त्यांच्या ई-कॉमर्स अॅप्सद्वारे सिलिंडर भरून घेण्यासाठी नोंदणी करू शकतात आणि पैसे भरू शकतात. उदा. ऍमेझॉन, पेटीएम इ.

एलपीजी ग्राहकांसाठी एलपीजी जोडणी पोर्टेबिलिटी

त्याच भागात सेवा देणार्‍या दुसर्‍या वितरकाकडे एलपीजी जोडणीचे ऑनलाईन हस्तांतरण करण्याची सुविधा एलपीजी ग्राहकांना संबंधित तेल विपणन कंपन्यांचे वेब-पोर्टल तसेच त्यांच्या मोबाईल अॅप्सद्वारे प्रदान करण्यात आली आहे.

नोंदणीकृत लॉग इन वापरून ग्राहकांना त्यांच्या क्षेत्रातील वितरकांच्या यादीमधून त्यांच्या तेल विपणन कंपनीचा वितरक निवडता येईल आणि ग्राहकांना त्यांच्या एलपीजी जोडणीचा वितरक बदलून घेण्यासाठी पर्याय मिळेल. ही सुविधा विनामूल्य आहे आणि या सुविधेसाठी कोणतेही शुल्क किंवा हस्तांतरण शुल्क देय नाही. मे, 2021मध्ये 55759 पोर्टेबिलिटी विनंत्या तेल विपणन कंपन्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content