Homeमुंबई स्पेशलआता पूर्वीप्रमाणेच आनंद...

आता पूर्वीप्रमाणेच आनंद लुटा राणीच्या बागेत!

मुंबईच्या भायखळ्यातले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) येत्या सोमवारपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२१ पासून पूर्वीप्रमाणेच म्हणजे नियमित वेळेनुसार नागरिकांकरिता खुले राहणार आहे.

महापालिका प्रशासनाने काल याची घोषणा केली. कोविड–१९ संसर्ग कालावधीत बंद असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सोमवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२१ पासून नियमित वेळेनुसार पर्यटकांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर प्रभातफेरीसाठी येणाऱ्या नागरिकांकरिता सकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत पुन्‍हा खुले करण्यात येणार आहे. मात्र, प्राणिसंग्रहालयातील तिकीट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्यात येईल.

दिवसभरात / सुटीच्‍या दिवशी कोणत्‍याही वेळेस प्राणिसंग्रहालयामध्‍ये जास्‍त प्रमाणात गर्दी झाली असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास कोविड सुरक्षेच्‍या उपाययोजनांमुळे प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार पर्यटकांकरिता ताबडतोब बंद करुन तिकिट विक्री थांबविण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नागरिक व लहान मुले (५ वर्षांखालील) यांनी शक्‍यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

राणीच्या बागेत वावरताना कोणती काळजी घ्यावी याच्या सूचनाही पालिकेने दिल्या आहेत.

कोविड-१९च्या काळात नागरिकांनी घ्यावयाची दक्षता

१) वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. मात्र, तिकिट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्‍यात येईल. 

२) प्राणिसंग्रहालयात प्रवेश करताना मुखपट्टी (मास्क) चा वापर अनिवार्य असेल.

३) कोविड विषाणुंचा प्रादुर्भाव / संसर्ग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि ५ वर्षांखालील लहान मुलांनी शक्‍यतो भेट देणे टाळावे अथवा विशेष काळजी घ्‍यावी.

४) कोविड विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहवे, गर्दी करू नये. दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.

५) प्राणिसंग्रहालयात येताना सोबत कमीतकमी साहित्य आणावे. साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

६) प्रवेशद्वाराजवळील हात निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) सुविधेचा उपयोग केल्यानंतरच  प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा.

७) प्राणिसंग्रहालयात प्रवेश केल्यावर गर्दीने / समुहाने फिरू नये. प्रदर्शनीय क्षेत्रात प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये.

८) कोविड विषाणुंचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये.

९) प्राणिसंग्रहालयात केरकचरा इतरत्र टाकू नये व थुंकू नये. कचराकुंडीचा वापर करावा.

१०) एकवेळ वापराचे (सिंगल यूज) मास्क व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचऱ्याच्या डब्यात टाकावे.

११) कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्राणिसंग्रहालयातील जवळपासच्या सुरक्षारक्षकांशी संपर्क साधावा.

१२) कोणतेही खाद्यपदार्थ प्राणिसंग्रहालयात आणू नये.

१३) प्रसाधनगृहाचा वापर केल्यानंतर प्रसाधनगृहातील साबण द्रावणाचा (लिक्वीड सोप) उपयोग करावा.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content