भारतातील विविध भाषांमधील ऑडिओबुक्सची मागणी आणि आवड बघता स्टोरीटेलने आता श्रोत्यांसाठी ११ भारतीय भाषांमधील एक विशेष सबस्क्रीप्शन प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. ‘सिलेक्ट’ असे या प्लॅनचे नाव असून यात आपल्याला ११ स्थानिक भारतीय भाषांमधील ऑडिओबुक्स ऐकता येणार आहेत.
याआधी फक्त मराठी भाषेसाठी सिलेक्ट प्लॅन उपलब्ध करण्यात आला होता. यात सर्व मराठी ऑडिओबुक व ईबुकचा समावेश होता. या प्लॅनला विशेष यशही मिळाले. या यशानंतर आता हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलुगू, आसामी, गुजराती, ओडिसी आणि कन्नड या ११ भारतीय भाषांमधील विविध ऑडिओबुक्स तुम्हाला दरमहा १४९/- रूपयांमध्ये उपलब्ध होतील.
स्टोरीटलच्या ग्राहकांना आता सबस्क्रीप्शनचे अनलिमिटेड आणि सिलेक्ट असे दोन पर्याय उपलब्ध होतील. ‘सिलेक्ट’ योजनेत दरमहा फक्त १४९ रूपयांत ११ भाषांतील हजारो पुस्तके ऐकता येतील. तर, ‘अनलिमिटेड’ योजनेत फक्त २९९ रूपयांत ११ भारतीय भाषांतील आणि आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषेतील दोन लाखांहून अधिक अभिजात पुस्तकेही ऐकायला मिळतील. ग्राहक यातील आपल्याला हवा तो पर्याय निवडू शकतात व ऑडिओबुक्स ऐकण्याचा अमर्याद आनंद घेऊ शकतात.
पुस्तकप्रेमी व साहित्यप्रेमी श्रोत्यांना स्टोरीटेलवर दिग्गज लेखकांचे अभिजात साहित्य ऐकायला मिळेल. यात ज्येष्ठ लेखकांपासून ते प्रतिथयश व नवोदित लेखकांनी लिहिलेल्या दर्जेदार कादंबऱ्या, कथा, आत्मचरित्रे उपलब्ध आहेत. पु. ल. देशपांडे, सुहास शिरवळकर, रत्नाकर मतकरी, शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, भालचंद्र नेमाडे अशा मराठीतील मान्यवर साहित्यिकांच्या लेखकांच्या लेखणीतून अजरामर झालेल्या कलाकृती श्रोत्यांना या ‘सिलेक्ट”मध्ये ऐकता येतील.
मृत्यूंजय, युगंधर, छावा, निवडक पुलं असं अभिजात साहित्य स्टोरीटेलवर अतिशय लोकप्रिय आहेत. याशिवाय नव्या पिढीतील लेखकांची लोकप्रिय ओरिजिनल ऑडिओ बुक्सही यात ऐकता येतील. ही ऑडिओबुक्स लोकप्रिय अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, संदीप खरे, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, अतुल पेठे, उदय सबनीस आदि नामवंतांनी वाचली आहेत.
स्टोरीटेल सिलेक्ट हा स्टोरीटेलच्या प्रवासामधील महत्त्वाचा टप्पा आहे. रसिक श्रोत्यांना जे आवडतं आणि ऐकायचं आहे, तेच देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सिलेक्टच्या माध्यमातून आम्ही रसिक श्रोत्यांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांना साहित्याची आणि कथांची गोडी निर्माण व्हावी हे आमचे ध्येय आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडीचा पर्याय निवडता यावा यासाठी आम्ही सिलेक्टची सुरूवात करत आहोत. आमच्या पाहण्यात आले की, इंग्रजीशिवाय भारतातील इतर भाषांमधील ऑडिओबुक्सही लोक मोठ्या प्रमाणात ऐकतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेतील ऑडिओबुक्स अत्यंत माफक दरात आम्ही उलब्ध करून देत आहोत, अशी माहिती स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ यांनी सांगितले.
स्टोरीटेल गुगल प्ले तसेच अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.
स्टोरीटेल विषयी…
स्टोरीटेल ही उत्तर युरोपातील ऑडिओ बुक व ई-बुक सेवा देणारी अग्रगण्य कंपनी आहे. या अॅपद्वारे वेगवेगळ्या भाषांतील जवळपास ५ लाखांहून अधिक पुस्तके ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. कोणासही, कोठूनही आणि केव्हाही कोणीही शेअर केलेली पुस्तके वाचता यायला हवी, त्यामुळे जग समानुभूतीने आणखी जवळ येईल हे स्टोरीटेलचे ध्येय आहे. स्टोरीटेल हे एक डिजिटल व्यासपीठ आहे तसेच ती एक मोठी प्रकाशन संस्थाही आहे. स्ट्रीमिंग व्यवसाय क्षेत्रात स्टोरीटेल आणि मोफिबो ब्रँड अंतर्गत ऑडिओबुक आणि ई-बुकसाठी सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. डिजिटल-रीड-ऑल-कॅन स्ट्रीमिंग सेवा ही वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी जानेवारी 2019पासून स्टोरीटेलचा भाग आहे. स्टोरीटेल जगभरातील 20 देशांत कार्यरत असून त्याचे मुख्यालय स्टॉकहोम, स्वीडन येथे आहे. अधिक माहितीसाठी https://www.storytel.com या वेबसाईटला भेट द्या.