Homeमुंबई स्पेशलआता सिद्धीविनायकाला, खेतवाडीच्या...

आता सिद्धीविनायकाला, खेतवाडीच्या राजाला दान करा ऑनलाईन!

आता मुंबईतल्या प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरापासून मुंबईतल्या १४ प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सवात पैशांचे दान द्या ऑनलाईन! भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी ब्रॅण्‍ड पेटीएमची मालक असलेल्‍या वन९७ कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडने (ओसीएल) मुंबईतील १४ गणेश मंडळांसोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत गणेशभक्‍तांना गणेशोत्‍सवादरम्‍यान पेटीएम क्‍यूआर कोड स्‍कॅन करत मंदिर ट्रस्‍टला दान करण्‍यास प्रेरित करण्‍यात आले आहे.

ही १४ गणेश मंडळे आहेत प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर, गिरगाव येथील गिरगावचा महाराजा, लालबाग येथील तेजुकाया मंडळ, अंधेरी पश्चिम येथील अंधेरीचा राजा, मरोळ, अंधेरी पूर्व येथील मरोळचा राजा, खेतवाडीमधील खेतवाडीचा राजा, परेल येथील परेलचा इच्‍छापूर्ती, लाल मैदान, लोअर परेल येथील फ्रेण्‍ड सर्कल मंडळ, लालबाग येथील बालयुवक मित्र मंडळ, लोअर परेल जंक्‍शन येथील बालसाथी मंडळ, चेंबूर येथील सह्याद्री गणपती, पवई येथील पवईचा राजा, कांदिवली येथील महावीर नगर आणि ठाणे येथील ठाण्‍याचा महाराजा.

गणेश चतुर्थीच्‍या शुभप्रसंगी कंपनीने आकर्षक सूट देण्‍यासाठी पेटीएम डील्‍सवर मिठाईची दुकाने व रेस्‍टॉरंट्सनादेखील ऑनबोर्ड केले आहे. वापरकर्त्‍यांना ब्रिजवासी, सातू (Satu’s) यासारख्‍या प्रसिद्ध मिठाईच्‍या दुकानांमधून मिठाईची आणि रेस्‍टॉरंट्समधून खाद्यपदार्थांची ऑर्डर करताना पेटीएम रेस्‍टॉरंट डील्‍समधून जवळपास ३० टक्‍के सूट मिळू शकते. त्‍वरित सूट मिळवण्यासाठी ग्राहक बँक ऑफर्सचादेखील लाभ घेऊ शकतात. तसेच, वापरकर्त्‍यांना पेटीएम पोस्‍टपेडच्‍या माध्‍यमातून पेमेंट केल्‍यास १००० रूपयांच्‍या बिलवर ५० रूपये कॅशबॅक आणि पेटीएम वॉलेटच्‍या माध्‍यमातून पेमेंट केल्‍यास ५ टक्‍के म्‍हणजेच जवळपास १०० रूपयांची कॅशबॅक मिळू शकते.

दुकानांमध्‍ये पेटीएमच्‍या कार्ड मशिन्‍सदेखील आहेत, जेथे वापरकर्ते पेटीएम क्‍यूआर कोड स्‍कॅन करत पेमेंट्स करू शकतात. पेटीएम कार्ड मशिनसह व्‍यापारी ग्राहकांकडून सर्व प्रकारचे पेमेंट्स स्‍वीकारू शकतात, जसे डेबिट व क्रेडिट कार्ड्स, पेटीएम वॉलेट, नेट बँकिंग व सर्व यूपीआय अॅप्‍स. याव्‍यतिरिक्‍त, पेटीएम मुंबईमधील विविध सोसायटींमध्‍ये स्‍टॉल्‍स उभारतील, जेथे वापरकर्त्‍यांसह कुटुंबातील सदस्‍य मोदक बनवण्‍यास शिकू शकतील.

तसेच, यंदा गणेशोत्‍सवानिमित्त पेटीएम इंडिगो, एअरएशिया, आकासा, स्‍पाइसजेट, विस्‍तारा व एअर इंडिया अशा सर्व देशांतर्गत फ्लाइट्सवर १२ टक्‍क्‍यांची, म्‍हणजेच जवळपास १,००० रूपयांची सूट प्रदान करत आहे. या ऑफरचा लाभ घेण्‍यासाठी वापरकर्त्‍यांनी पेमेंट्सदरम्‍यान प्रोमो कोड ‘FLYUTSAV’चा वापर करणे आवश्‍यक आहे. बसने प्रवास करणाऱ्या वापरकर्त्‍यांसाठी प्रोमो कोड ‘PAYTMBUS’च्‍या वापरावर ४०० रूपयांची सूट मिळू शकते. रेल्‍वे तिकिटे बुकिंगसंदर्भात वापरकर्ते झीरो सर्विस व पेमेंट गेटवे शुल्‍कांच्‍या लाभासह तिकिटे बुक करू शकतात. प्रवास करण्‍याच्‍या तारखेमध्‍ये बदल करण्‍यासंदर्भात वापरकर्त्‍यांना फ्री कॅन्‍सलेशनच्‍या माध्‍यमातून फ्लाइट, बस व रेल्‍वे तिकिटांवर १०० टक्‍के रिफंड मिळू शकते.

पेटीएम प्रवक्‍ता म्‍हणाले की, ”आम्‍ही गणेशोत्‍सवानिमित्त मुंबईतील गणेश मंडळांमध्‍ये डिजिटल दान सक्षम केले आहे. गणेशभक्‍त पेटीएम क्‍यूआर स्‍कॅन करू शकतात आणि पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट अशा सुविधांच्‍या माध्‍यमातून पेमेंट करू शकतात. आम्‍ही देशाच्‍या कानाकोपऱ्यापर्यंत आमच्‍या नाविन्‍यपूर्ण मोबाइल पेमेंट सोल्‍यूशन्‍सचा विस्‍तार करत आर्थिक समावेशनाला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

फिनटेक अग्रणी पेटीएमने डिजिटल दान सुलभ व सोईस्‍कर करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतभरातील गणेशभक्‍त त्‍यांच्‍या घरांमधून सोयीने पेटीएम सुपर अॅपवरील ‘Devotion’ विभागावरूनदेखील दान करू शकतात.   

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content