Homeबॅक पेजआता डेटा सेंटर्स...

आता डेटा सेंटर्स वाचणार ‘ओव्हरहीटिंग’पासून!

भारताच्या डिजिटल क्रांतीला आता स्वदेशी विज्ञानाची जोड मिळणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (AI) वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्समध्ये निर्माण होणारी प्रचंड उष्णता कमी करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि जागतिक पायाभूत सुविधा कंपनी ‘व्हर्टिव्ह’ यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५पर्यंत हाय-टेक चिप्सचा वीज वापर १,२०० वॅट्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असताना, हे नवे तंत्रज्ञान डेटा सेंटर्सना ‘ओव्हरहीटिंग’पासून वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करता येणार आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच डेटा सेंटर चालवण्याचा खर्चही बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

या भागीदारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आयआयटी मुंबईने विकसित केलेले ‘रोटेटिंग कॉन्टॅक्टिंग डिस्क’ हे पेटंट तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान एअर कंडिशनिंगसाठी लागणारी अवाढव्य वीज वाचवण्यास मदत करते. यामुळे डेटा सेंटरची कार्यक्षमता १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात व्हर्टिव्हने डिझाइन केलेल्या ४० किलोवॅट क्षमतेच्या कूलिंग सिस्टीमपासून होणार आहे. या प्रणालीची पहिली चाचणी आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत होईल आणि त्यानंतर व्हर्टिव्हच्या पुणे येथील अत्याधुनिक प्रकल्पात तिचे अंतिम परीक्षण केले जाईल. हे तंत्रज्ञान केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योगांत वापरले जाणार असल्याने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेला मोठी ताकद मिळणार आहे.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे आणि व्हर्टिव्ह इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुभाशिष मजुमदार यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पामुळे केवळ तंत्रज्ञान विकसित होणार नाही, तर भारतीय विद्यार्थ्यांना भविष्यातील ‘थर्मल इंजिनीअरिंग’चे प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहेत. जेव्हा शैक्षणिक संशोधन आणि जागतिक दर्जाचा औद्योगिक अनुभव एकत्र येतो, तेव्हा भारताची डिजिटल प्रगती रोखणे अशक्य आहे, असा विश्वास दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content