कृष्णधवल काळापासून ते अगदी श्रीदेवीच्या काळापर्यंतची दर्जेदार गाणी तितक्याच दर्जेदार पद्धतीने सादर करणाऱ्या नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नॉस्टाल्जिया’ नृत्याविष्कारने रसिक त्यांच्या भूतकाळात रमले.
मुुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शरयू नृत्य कला मंदिरच्या कलाकारांनी आपली अदाकारी पेश करत रसिकांना रममाण केले. हिंदी आणि मराठी सिनेसंगीतावर आधारित असलेली ही नृत्य प्रस्तुती सोनिया परचुरे यांच्या नृत्य दिग्दर्शनामुळे प्रेक्षकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. ती उत्तम आणि दर्जेदार संगीताची आणि नृत्य दिग्दर्शनाची सुंदर सफर घडवणारी ठरली. रसिकांचा विशेष प्रतिसाद या कार्यक्रमास मिळाला.