Homeमुंबई स्पेशलट्रॉम्बे, चेंबूर परिसरात...

ट्रॉम्बे, चेंबूर परिसरात बुधवारी पाणीपुरवठा बंद

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे बुधवार, दि. ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे बुधवार, दि. ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून गुरुवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित (बंद) राहील.

एम/पूर्व आणि एम/पश्चिम या विभागातील पाणीपुरवठा खंडित होणारा परिसरारांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१) एम/पूर्व विभागः बीट क्रमांक १४० ते १४६ – टाटानगर, गोवंडी स्टेशन मार्ग, देवनार म्युनिसिपल वसाहत (कॉलनी), गोवंडी, लल्लूभाई इमारत, जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार गाव रस्ता, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गाव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव, गोवंडी स्टेशन रोड, सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा चिता कॅम्प ट्रॉम्बे, देवनार फार्म रोड, बोरबादेवी नगर, बी.ए.आर.सी. फॅक्टरी, बी.ए.आर.सी. वसाहत (कॉलनी), गौतम नगर, पांजरापोळ – (दि. ०८.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दि. ०९.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद).

२) एम/पश्चिम विभागः बीट क्रमांक १५२ व १५३ – घाटला अमर नगर, मोती बाग, खारदेव नगर, वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत (कॉलनी), लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लाल वाडी, मैत्री पार्क, अतूर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर – (दि. ०८.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दि. ०९.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद).

जनतेने या कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content