Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या के पूर्व...

मुंबईतल्या के पूर्व आणि जी उत्तर भागाला आज पाणी नाही!

तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे मुंबईतल्या ‘के पूर्व’ आणि ‘जी उत्तर’ विभागात आज पाणीपुरवठा होणार नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही गळती दुरुस्त करण्याचे काम जल अभियंता खात्याद्वारे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

पाणी

आज दि. ०८ एप्रिल २०२३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा जलवाहिनीवर दुपारी ३.३०च्या सुमारास पवई येथे आकस्मिकरित्या मोठी पाणीगळती सुरू झाली आहे. ही गळती दुरुस्तीच्या कामासाठी तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करून सदर दुरुस्ती काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी जल अभियंता खात्यास अपेक्षा आहे.

आकस्मिकरित्या उद्भवलेल्या या गळतीमुळे सध्या सुरू असलेला ‘के पूर्व’ विभागाचा पाणीपुरवठा आणि संध्याकाळी होणारा ‘जी उत्तर’ विभागाचा (धारावी) पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. संबंधितांनी याची नोंद घेऊन असलेले पाणी जपून, काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content