Homeचिट चॅटयुवा अॅथलेटिक्स स्पर्धेत...

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि नवी मुंबई जिल्ह्यातील ५०पेक्षा अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ४८०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्स, श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, टीजेएसबी बँक हे स्पर्धेचे प्रायोजक होते.

ही स्पर्धा १४, १७, १९ वर्षांखालील मुलामुलींच्या गटात संपन्न झाली. ओंकार इंग्लिश मीडियम स्कूल, होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल, सेंट जॉन बॉस्को हायस्कूल, भारतीय सैनिक विद्यालय आणि सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल या शाळांच्या खेळाडूंनीदेखील या स्पर्धेत चमक दाखवली.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटातील सर्वोत्तम धावपटू म्हणून चैतन्य साळवे आणि अर्णव साबळे यांची निवड झाली, तर १४ वर्षाखालील मुलींच्या गटात अॅना एन आणि आरोही नलावडे यांनी हा मान मिळवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम शेट्टी, ध्रुव शिरोडकर आणि १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मिहिका सुर्वे आणि रिद्धी माने यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात समर्थ भिंगारदेवे, आयुष पाटील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या गटात लावण्या बांगर यांनी सर्वोत्तम धावपटूंचा मान मिळवला. गोळाफेकमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात राज प्रजापती, १७ वर्षांंखालील मुलांच्या गटात खुशाल तिवारी आणि १९ वर्षांखालील मुलांच्या गटात स्टॅनिस क्वाड्रोस यांनी सुवर्णपदके जिंकली. १४ वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक स्पर्धेत ऋतुजा वारदेकर आणि १७ वर्षांखालील गटात नव्या चकूरकर यांनी पहिला क्रमांक मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content