देशातल्या लोकसभा निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता आजपासून उठविण्यात आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपर्यंत तेथील आचारसंहिता मात्र कायम राहील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
याबाबतची अधिसूचना आज जारी करण्यात आली. लोकसभेच्या निवडणुका घोषित करताना साधारण दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता जारी केली होती. सात टप्प्यात झालेल्या मतदानानंतर चार जूनला मतमोजणी होऊन संपूर्ण निकाल जाहीर झाल्यावर ही प्रक्रिया संपल्याचे सांगत निवडणूक आयोगाने आचारसंहिता उठवण्यात आल्याचे घोषित केले.
याबाबतची अधिसूचना अशीः