Homeटॉप स्टोरीनरेंद्र मोदींचा भूतान...

नरेंद्र मोदींचा भूतान दौरा ऐनवेळी रद्द!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजपासून सुरू होणारा भूतानचा दोन दिवसांचा दौरा काल रात्री उशिरा रद्द करण्यात आला. खराब हवामानामुळे पंतप्रधानांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालय तसेच भूतान सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले. पंतप्रदानांच्या भूतान दौऱ्याची पुढची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी भूतानला रवाना होणार होते. भूतानच्या पॅरो, या एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते उतरणार होते. तेथून ते थिंफू, या भूतानच्या राजधानीकडे रवाना होणार होते. त्याच मार्गाने उद्या ते मायदेशी परतणार होते. परंतु पॅरो परिसरात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त झाल्याने पंतप्रधान मोदींचा हा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे कळते.

लोकसभा निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाकरीता उमेदवारी अर्ज भरण्यास काल सुरूवात झाली. निवडणूक प्रचाराला वेग येत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 21 मार्चला दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यासाठी रवाना होणार होते. त्यामुळे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर परदेश दौऱ्यावर जाणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार होते.

भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि सरकारच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणावरील भर या अनुषंगाने हा दौरा होता. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना भेटणार होते. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांच्याशीही मोदी चर्चा करणार होते.

भारत आणि भूतान यांच्यात परस्पर विश्वास, सामंजस्य आणि सद्भावना यावर आधारित अद्वितीय आणि चिरस्थायी अशी भागीदारी आहे. उभयातांतील सामायिक आध्यात्मिक वारसा आणि लोकांमधील जिव्हाळ्याचे संबंध दोन्ही देशांमध्ये दृढता आणि चैतन्य वृद्धींगत करतात. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांना स्वारस्य असलेल्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक बाबींवर विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि आपल्या लोकांच्या फायद्यासाठी या भागीदारीचा विस्तार आणि ती अधिक घनिष्ठ करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याची संधी मिळेल.

पंतप्रधान

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून देशभरात प्रचाराला अधिकृतपणे सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून देशातल्या विविध राज्यात विकासकामांचे लोकार्पण, भूमीपूजन वा तत्सम कारणांच्या निमित्ताने जाहीर सभांमधून प्रचाराची राळ उडवत होते. भारतीय जनता पार्टीचे ते स्टार प्रचारक म्हणून पहिल्या क्रमांकावर राहणार आहेत. अशा व्यस्त दिनचर्येतही पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार होते.

जानेवारीत पदभार सांभाळल्यानंतर भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे मागच्याच आठवड्यात पाच दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. या भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना भूतानच्या राजांच्या वतीने भूतान भेटीचे निमंत्रण दिले होते आणि पंतप्रधान मोदींनी ते स्वीकारलेही. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांकडून परस्पर संबंध, सांस्कृतिक तसेच पर्यटन, पायाभूत सुविधा आणि संरक्षणविषयक करारांवर सह्या होण्याची शक्यता आहे. डोकलामच्या माध्यमातून भूतानवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला एक संदेश देण्याचाही प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीमागे असू शकेल, असा जाणकारांचा होरा आहे.

Continue reading

अंकुश मोरे गौरव कबड्डी १५ डिसेंबरपासून

आंतरराष्ट्रीय पंच, ज्येष्ठ कबड्डी संघटक अंकुश मोरे यांच्या एकसष्ठीपूर्तीनिमित्त गोरेगावच्या अभिनव कला आणि क्रीडा अकॅडेमीने अभिनव क्रीडा मंडळ, एकता क्रीडा मंडळ, वडगाव आणि स्पोटवूट यांच्या सहकार्याने येत्या १५ ते २० डिसेंबर या कालावधीत भव्य जिल्हास्तरीय सुपर लीग आणि बाद...

आवडेल, भावेल असा साहित्यिक कार्यक्रम १३ डिसेंबरला मुंबईत

साहित्याची आवड असणाऱ्या सर्व लेखक, वाचक यांना आवडेल, भावेल असा साहित्यिक कार्यक्रम, येत्या १३ डिसेंबरला कोकण मराठी साहित्य परिषद, दादर शाखा आणि कोमसाप, मुंबई जिल्हा, कोमसाप युवा शक्ती यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबई शिवाजी पार्क, दादर यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सानेगुरुजी...

मनोरा बॅडमिंटनः सात्रा, राजपूत, साळुंखे, डेनिस, चांडक, देसाई, गावडे, सामंत विजेते

मुंबईतल्या मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने नुकत्याच खार जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या ११८व्या बॅडमिंटन स्पर्धेत पेहेर सात्रा, साऊजा राजपूत, आरोही साळुंखे, निवान डेनिस, अर्णा चांडक, अजिंक्य देसाई, रुद्रा गावडे, साईराज सामंत यांनी आपापल्या गटात विजेतेपदाचा मान मिळवला. राज्याच्या विविध...
Skip to content