Homeबॅक पेज२४ व २५...

२४ व २५ फेब्रुवारीला ठाण्यात ‘नमो महारोजगार मेळावा’!

महाराष्ट्राच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदूर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवावी तसेच नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मेळाव्यात सहभाग होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले.

मुंबईतल्या वांद्रे पूर्व येथे नमो महारोजगार मेळाव्याच्या पूर्वतयारी संदर्भात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी क्षीरसागर बोलत होते. यावेळी रवींद्र सुरवसे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, मुंबई उपनगर, संदीप गायकवाड, सहायक आयुक्त मुंबई शहर व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्री. पा. कोकाटे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किशोर केरलीकर, शासकीय तंत्रनिकेतन मुंबईचे प्रशिक्षण अधिकारी काशिनाथ धुळशेटे, वरिष्ठ संरक्षण अधिकारी गिरीधर चौरे, सहाय्यक कामगार आयुक्त निलेश देठे, जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण अधिकारी योगिता शंभरकर, उद्योग निरीक्षक विवेक लोखंडे यांसह इतर विविध विभागांचे अधिकारी तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी क्षीरसागर म्हणाले की, या रोजगार मेळाव्यामध्ये शासनाच्या प्रत्येक विभागाने आपल्या रिक्त पदांची माहिती तातडीने नोंदवावी. दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेऊन रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. राज्यातील नामांकित स्टार्ट अप, शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल उमेदवारांना माहिती देण्याकरिता असतील. उमेदवारांना करियरविषयक माहिती देण्याकरिता समुपदेशन सत्र होणार आहे. मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंकवर जाऊन उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. याची माहिती जास्तीतजास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवावी. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. या माध्यमातून जास्तीतजास्त युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा यशस्वी करावा.

नमो महारोजगार मेळाव्याकरिता जास्तीतजास्त संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूची जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदूर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue reading

एका फ्लॅटचे दोन करताय? सावधान!

एका मोठ्या कुटुंबाला अधिक प्रायव्हसीची गरज आहे किंवा वाढत्या शहरात भाड्याने उत्पन्न मिळवण्याची संधी आहे, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील अनेकजण आपल्या मोठ्या अपार्टमेंट, फ्लॅटचे दोन भागांत विभाजन करण्याचा विचार करतात. हे एक सामान्य व्यावहारिक वास्तव आहे. पण, मुंबई उपनगरातील...

न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे पुढचे सरन्यायाधीश!

भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत यांची भारताचे पुढचे म्हणजेच 53वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. ते 23 नोव्हेंबरला आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश गवई यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत!

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज एक दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार...
Skip to content