Tuesday, December 24, 2024
Homeडेली पल्सपुराण, परशुराम जयंती...

पुराण, परशुराम जयंती अर्थात अक्षय्य तृतीयाचे!

भगवान परशुराम विष्णूच्या दहा अवतारांपैकी सहावा अवतार अशी मान्यता आहे. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करणारे क्रोधवतारी म्हणूनही पुराणात ओळखले जातात. पुराणातील वर्णनानुसार शीघ्रकोपी ऋषी जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका यांचे सुपुत्र म्हणून परशुराम ओळखले जातात. अक्षय्य तृतीया सण हा त्यांचा जन्मदिन म्हणून साजरा होतो. या दिवशी जन्म घेतल्याने त्यांची शक्ती क्षय होत नाही. महर्षी वेदव्यास, अश्वत्थामा, राजा बळी, श्री हनुमान, विभीषण, कृपाचार्य, ऋषी मार्कंडेय यांचा समावेश कालियुगाच्या शेवटपर्यंत अमर राहणाऱ्यांमध्ये आहे. अज्ञाकारी म्हणून परशुरामांनी पित्याच्या सांगण्यानुसार माता रेणुकेच शीर उडवलं होतं. हैहाय वंशाच्या क्षत्रियांचं २१ वेळा शिरकाण त्यांनी केलं. ब्राह्मण कुळ पण कर्म क्षत्रिय अशी ओळख आहे त्यांची.

समुद्र हटवून कोकणची भूमी त्यांनी निर्माण केल्याने कोकणाला परशुराम भूमी अशी ओळख आहे. मुंबई गोवा महामार्गावर श्री क्षेत्र लोटे परशुराम नावाने मोठं मंदिर असून ब्राह्मणांचे गुरू अशीही ख्याती आहे. शस्त्रविद्येचे महान गुरू असलेल्या परशुरामांनी भीष्म, कर्ण इतकेच नव्हे तर द्रोणाचार्यनादेखील शस्त्र शिक्षण दिले होते. तपश्चर्येच्या बळावर भगवान शंकर यांच्याकडून परशु (फरसा) मिळवले म्हणून त्यांना परशुराम नाव मिळाले. या भगवान परशुरामांचे परशु पृथ्वीच्या कुठल्या कोपऱ्यात गाडलं गेलं आहे, जो कोणी ते काढण्याचा प्रयत्न करतो किंवा हात लावतो त्याचा सर्वनाश होतो ही जागा कुठे ते जाणून घ्या.

भगवान परशुराम यांचं परशु झारखंड राज्यातील रांची या राजधानी शहरापासून १६६ किमीवरील टांगीनाथधाम येथे आहे. या जागेशी परशुरामांचा निकटचा संबंध असल्याचे सांगितले जाते. येथील स्थानिक, भाषेत परशुला टांगी म्हणतात. त्यामुळे हे नाव पडलं. आजही इथं परशुरामाची पावलं पाहायला मिळतात. या परशूला खुल्या वातावरणात राहूनही अद्याप गंज चढलेला नाही. त्याच्या प्राथमिक स्थितीत काहीही फरक पडला नसल्याचं सांगतात. हा परशु जमिनीत किती खोलवर गाडला गेलाय हे कोणी सांगू शकत नाही. मात्र, याच्याशी निगडित एक आख्यायिका सांगितली जाते. एक लोहारानं भगवान परशुरामाचा हा ‘फरसु’ कापायचा प्रयत्न केला. पण तो कापू शकला नाही. मात्र, त्याचा परिणाम असा झाला की, त्याच्या कुटुंबातील सदस्य एक एक करून मरू लागले. त्यानंतर तो गाव सोडून पळून गेला. त्यामुळे कोणीही तशी हिंमत करत नाही.

परशुराम

सीता स्वयंवरात साक्षात शिव शंकराचं धनुष्य भगवान राम यांनी तोडल्याचं पाहून परशुराम प्रचंड क्रोधीत झाले. त्यामुळे त्यांनी रामाची चांगलीच खरडपट्टी काढली, पण राम शांत होते. प्रभू राम विष्णू अवतार असल्याचे समजल्यावर ते लज्जित झाले. याचे प्रायश्चित्त म्हणून ते घोर अरण्यात निघून गेले. तेथे आपला परशु गाडून तपश्चर्या केली, हीच ती जागा आज टांगीनाथ धाम म्हणून ओळखली जाते. त्यांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भक्त येतात. टांगीनाथ धामचा शिवशंकराशी संबंध लावूनही पहिला जातो. असेही म्हंटलं जातं की हे परशु म्हणजे शंकराचं त्रिशूल आहे. शिव शंकर शनि महाराजावर क्रोधीत झाले त्यावेळी त्यांनी आपल्या त्रिशूलाने प्रहार केले. शनी कसेबसे स्वतःला वाचविण्यात यशस्वी ठरले. पण तो त्रिशुळ मात्र एका पर्वतात जाऊन रुतला. हाच तो त्रिशूल, कारण या फरशाची वरील बाजू काहीशी त्रिशूळशी मिळतीजुळती आहे. यामुळे याला त्रिशूलदेखील मानले जाते. मात्र ही एक दंतकथा आहे.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवसाला अक्षय्य तृतीया संबोधले जाते. साडेतीन मुहूर्तापैकी एक असे याचे वैशिष्ट्य आहे. काल विवेक या ग्रंथांबरोबर जैन धर्मातही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व नमूद केलं आहे. या दिवसाला आखा तिज असेही म्हणतात. परशुराम जयंतीसह नर नारायण, बसवेश्वर जयंती, हयग्रीव जयंती यादिवशी असते. त्याचबरोबर महाभारताची रचना करायला महर्षी व्यास यांनी प्रारंभ केला आणि गणपतीने लेखनिक म्हणून काम सुरू केले अशी आख्यायिका सांगितली जाते. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य भरभरून मिळते तसेच सोनं व इतर खरेदी केल्यास त्यात टिकाऊपण येऊन अक्षय्य राहते अशी धारणा आहे. सोनं खरेदीने घरात सुखसंपन्नता वाढते. नपेक्षा दानतरी कराच. यादिवशी दान करण्याने येणार काळ चांगला येतो, अशी समजूत आहे.

महाराष्ट्रात चैत्र गौरीची स्थापना चैत्रात केल्यावर हळदी कुंकू सवाष्ण बायकांना दिलं जातं. या काळात बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुलं, गजरा, कैरी डाळ, पन्हे, देत हळदी कुंकू केलं जातं. अक्षय तृतीया याचा शेवटचा दिवस असतो. राजस्थानात हा दिवस शुभ मुहूर्त असून शहरी, ग्रामीण भागात विवाहाची पद्धत आहे. तिथला हा दिवस आखा तीज म्हणून ओळखला जातो. तर ओडिशात यादिवशी लक्ष्मीची पूजा करून नवीन धान्याच्या पेरणीचे काम करतात. याला मुठी चुहण म्हटले जाते. जगप्रसिद्ध अशा जगन्नाथ यात्रेचा याच दिवशी प्रारंभ होतो. या दिवशी पालेभाज्या ,मांसाहार सेवन वर्ज्य असते.

दक्षिण भारतात महाविष्णू आणि लक्ष्मी, कुबेर पूजनाचे विशेष महत्त्व असते. मंदिरात दर्शनाला जाणे, अन्नदान करणे, अशा प्रथा आचाराची पद्धत आहे. तर उत्तर भारतात पूजाप्रार्थना होते, परशुराम जन्मोत्सव साजरा करण्याबरोबरच गंगा नदी स्नान, यज्ञ याग, तीर्थ यात्रा करणे, अन्न धन दान, ब्राह्मणाला सातू समिधा देणे असे धर्माचरण केले जाते. पश्चिम बंगालात व्यापारी वर्ग मोठा सण म्हणून हा दिवस साजरा करतो. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.तर हालकटा नावाने गणपती लक्ष्मीचं पूजन केलं जातं. मग केली की नाही सोनं खरेदी! ऑनलाईन!!

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content