Homeमाय व्हॉईससहकाऱ्यांना ठाऊक आहे...

सहकाऱ्यांना ठाऊक आहे राष्ट्रवादी पुढे कसा जाणार…

आपला पक्ष, राष्ट्रवादी पुढे कसा जाणार हे आमच्या सहकाऱ्यांना माहित आहे. आम्ही काय करतो, त्यात आम्हाला समाधान आहे. त्यामुळे त्यांच्या त्या अग्रलेखाला आम्ही किंमत देत नाही, अशा आशयाची टिपण्णी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या मुखपत्रातून पवार यांच्यावर केलेल्या टिकेला चोख प्रत्त्युत्तर दिले.

पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले अशी टीका राऊतांनी या अग्रलेखात केली होती. त्यावर साताऱ्यात एका पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी राऊतांचा खरपूस समाचार घेतला. आम्ही काय केले हे त्यांना माहित नाही. आमचे एक वैशिष्ट्य आहे की आम्ही पक्षातील सहकारी अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मते व्यक्त असतात. पण बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी करत नाही. हा आमच्या घराचा प्रश्न आहे. घरामधील सहकाऱ्यांना ठाऊक आहे की आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. उद्या नवीन नेतृत्त्वाची फळी या पक्षात कशी तयार केली जाते याची खात्री पक्षातील सगळ्या सहकाऱ्यांना आहे, असे ते म्हणाले.

१९९९ साली आम्ही राज्यात सत्तेवर आलो. त्यावेळी मंत्रिमंडळ करायचं होतं. काँग्रेस आणि आमचं संयुक्त मंत्रिमंडळ होतं. त्यावेळी त्या नव्या मंत्रिमंडळात ज्या सहकाऱ्यांना आम्ही सहभागी करुन घेतलं त्यात जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर आर पाटील यांच्यासह अनेक नावं होती. त्यांच्या आयुष्यातील सत्तेची पहिली टर्म होती. त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती केली होती. महाराष्ट्राने बघितलं आहे की त्यांनी आपले कर्तृत्त्व दाखवलं आहे. त्यामुळे आम्ही तयार करतो की करत नाही, हे तुम्ही लिहिलं म्हणून होत नाही. त्यांना लिहायचा अधिकार आहे. आम्ही काय करतो आणि त्यात आम्हाला समाधान आहे, असेही पवार यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कुरबुरी पाहायला मिळत आहेत. परंतु या टीकेचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही. आपण मुंबईत गेल्यावर उद्धव ठाकरे, नाना पटोले या आघाडीतल्या नेत्यांशी चर्चा करू, असेही ते म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाणांची ग्रेड कोणती?

राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान केला होता. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षात काय ग्रेड आहे? ते ए आहे की बी, सी किंवा डी आहे हे त्यांनी आधी चेक करावं. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहे? ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे नाही सांगणार, असेही पवार म्हणाले.

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content