Homeचिट चॅटस्केटिंगमध्ये मुंबईच्या ज्येष्ठा...

स्केटिंगमध्ये मुंबईच्या ज्येष्ठा पवारला तीन सुवर्णपदके 

थायलंड येथे झालेल्या इन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत लोअर परळच्या (मुंबई) सहा वर्षीय ज्येष्ठा पवारने तीन सुवर्णपदकांची कमाई केली.

या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, फिलीपीन्स, बांगलादेश, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, केनिया अशा 11 देशांच्या स्केटर्सनी सहभाग दर्शवला. दादर येथील आयईएस ओरायन स्कूलमध्ये पहिलीत शिकणार्‍या ज्येष्ठाने  सुरुवातीला छंद म्हणून स्केटिंग शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्पीडएक्स स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. सध्या मेहमूद सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे. खूप मेहनत घेत ज्येष्ठाने अल्पावधीत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सुरेख छाप पाडली आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content