Homeमुंबई स्पेशलमुंबईत भोईवाड्यात संयुक्त...

मुंबईत भोईवाड्यात संयुक्त महाराष्ट्र मनोरंजन मैदान सज्ज

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १९६९ साली शहीद झालेल्या ६९ आंदोलकांना दरवर्षी ८ फेब्रुवारीला अभिवादन केले जाते. याचेच औचित्य साधत मुंबईच्या भोईवाडा येथे उभारण्यात आलेल्या बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती मनोरंजन मैदानात उद्या ८ फेब्रुवारीला अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी आवश्यक ती तयारी करून हे उद्यान आता त्याकरीता सज्ज करण्यात आले आहे.

मुंबई

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्यान तयार करण्यात आले आहे. नायगावची स्प्रिंग मिल तसेच वरळीची बॉम्बे डाईंग मिलच्या विकासादरम्यान बॉम्बे डाईंग मिलकडून नोव्हेंबर २०१४ साली महापालिकेला हा साधारण ३३ हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यात आला. उद्यान विभागाने दोन वर्षांत तो विकसित केला. फेब्रुवारी २०१६मध्ये ते जनतेसाठी खुले करण्यात आले. सध्या उद्यान विभागातर्फे त्याची नियमित देखभाल केली जाते.

मुंबई

या उद्यानात झेन लँडस्केप, सायकलिंग ट्रॅक, योगा विभाग, गझिबो, मातीचा जॉगिंग ट्रॅक, बहुउद्देश्यीय खेळाचे मैदान, सुगंधी फुलझाडे, हुतात्मा स्मारक, बोन्साय विभाग, कारंजे, खुली व्यायाम साधने, ज्येष्ठ नागरिक क्षेत्र, सॅण्ड पीट हे या उद्यानाचे आकर्षण आहे. सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी आणि व्यायामासाठी हे उत्कृष्ट ठिकाण आहे. मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल असल्याने तसेच बसण्याचे बेंच असल्याने अनेकांचे हे आवडते ठिकाण झाले आहे. उद्यानातल्या ६५ टक्के भागात लॉन, फुलझाडे व वृक्ष आहेत. पिंपळ, आंबा, नारळ, बहावा, अशा अनेक झाडांसह येथे दोन प्रचंड मोठे वटवृक्षही आहेत. गजबजलेल्या मुंबईत हे विरूंगळ्याचे अप्रतीम ठिकाण आहे. त्याला अवश्य भेट द्या. मजा येईल..

मुंबई

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content