Homeबॅक पेजमुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा...

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या मुंबईत मेळावा

मुंबई विभागीय राष्ट्रवादी  काँग्रेसच्यावतीने उद्या, ७ जानेवारी २०२४ रोजी मुंबईत षण्मुखानंद सभागृह येथे सायंकाळी ४ वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वावर जनतेचा विश्वास आहे हे सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मेळावा होत असून या मेळाव्यामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी होतील, असा विश्वास मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि मुंबईचे प्रभारी छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. या संवाद मेळाव्याला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही समीर भुजबळ यांनी केले आहे.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावर बैठक घेत, मुंबईमधील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मुंबईतल्या आढावा बैठकीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची घोषणा केली. सर्व घटकांना सामावून घेत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी आम्ही घोषित केली असून आगामी काळात आणखी बऱ्याच मंडळींचा समावेश या कार्यकारणीमध्ये असेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, आज आपण जवळपास ७३ लोकांची कार्यकारिणी घोषित करीत असलो तरी कार्यकारिणीसाठी किंवा अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. टप्प्याटप्प्याने आपण सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न करत मुंबई कार्यकारिणीमध्ये आणखी बऱ्याच लोकांचा समावेश करणार आहोत. घोषित झालेल्या कार्यकारिणीमध्ये एकूण १५ उपाध्यक्ष, १९ सरचिटणीस, ३७ सचिव आणि ६ चिटणीसांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी बबन मदने यांचीदेखील निवड करण्यात आली.

आतापर्यंत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत कमी कालावधीत २ कार्याध्यक्ष,  २ महिला कार्याध्यक्ष, १ युवक अध्यक्ष , ६ जिल्हाध्यक्ष, ३६ तालुकाध्यक्ष, ६ महिला जिल्हाध्यक्ष, १९० वॉर्ड अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात महिला कार्यकारिणी आणि युवक कार्यकारिणी यांचीदेखील घोषणा करून महिला आणि युवकांनादेखील समान संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहितीदेखील भुजबळ यांनी यावेळी दिली.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content