Homeहेल्थ इज वेल्थमुंबई महापालिकेच्या निवासी...

मुंबई महापालिकेच्या निवासी डॉक्टरांना शासनाप्रमाणे वेतनवाढ

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या, २२ जुलैपासून संप करण्याची सूचना दिली होती. या अनुषंगाने पदव्युत्तर निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांची संघटनेसोबत (मार्ड) पालिकेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांप्रमाणे मासिक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर समाधानकारक तोडगा निघाल्याने प्रस्तावित संप मागे घेत असल्याचे मार्डने जाहीर केले.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्ड ही राज्यातील सर्व सरकारी आणि महापालिका वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांची संघटना आहे. या संघटनेच्या वतीने, मुंबई महापालिकेच्‍या वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्‍युत्‍तर निवासी विद्यार्थ्‍यांनी उद्या २२ जुलैला संपाची हाक दिली होती. पगारामध्‍ये वाढ, वसतिगृहामध्ये (हॉस्टेल) अधिक चांगल्‍या सुविधा तसेच इतर काही मागण्‍यांसाठी त्‍यांनी संपाचा इशारा दिला होता.

या अनुषंगाने पालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत मार्डसमवेत बैठक पार पडली. उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे, वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्व अधिष्‍ठातादेखील यावेळी उपस्थित होते.

या निर्णयानुसार पदव्युत्तर निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मासिक वेतनात शासकीय महाविद्यालयातील वि‍द्यार्थ्‍यांप्रमाणे वेतन देण्‍याचे व महागाईभत्‍त्‍यात वाढ देण्‍याचे तसेच गत ५ महिन्‍यांची थकबाकी १० ऑगस्‍टपर्यंत देण्‍याचे पालिका प्रशासनाने मान्‍य केले आहे.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content