Wednesday, February 5, 2025
Homeमुंबई स्पेशल२/३ दिवसांत भरला...

२/३ दिवसांत भरला जाणार मुंबईच्या पालिका आयुक्तांच्या बंगल्याचा कर

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान अर्थात महानगरपालिका आयुक्त बंगल्याच्या मालमत्ता कर रकमेचे देयक ५ मार्च २०२४ रोजी प्रसारित करण्यात आले होते. मालमत्ता कराचे देयक प्रसारित झाल्यापासून त्याचा भरणा करण्याची मुदत तीन महिन्यांची असते. यानुसार सदर देयक भरण्याची अंतिम मुदत ५ जून २०२४पर्यंत आहे. असे असले तरी, सदर संपूर्ण कर देयक अर्थात रुपये ४ लाख ५६ हजार इतका भरणा करण्याची कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे. कार्यालयीन आणि बँकिंग कामकाजाची वेळ लक्षात घेता कार्यालयीन कामकाजाच्या दोन ते तीन दिवसात ही रक्कम प्रत्यक्ष जमा होईल, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्हीच मुंबईच्या महापालिका आयुक्तांच्या बंगल्याची मागील 14 वर्षांच्या विविध करांची 4.56 लाखांची थकबाकी थकलेली असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर पालिकेने हा खुलासा केला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. गलगलींनी आयुक्त कार्यालयाकडे 29 डिसेंबर 2023 रोजी अर्ज करत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी आपल्या बंगल्यावर वीजसुविधांसाठी केलेल्या खर्चाबाबतचा मागील 5 वर्षांची माहिती माहिती मागितली होती. ही माहिती महिन्यानुसार एकूण वीज आकार, वापरलेले युनिट अशा स्वरूपात मागितली गेली होती.

अनिल गलगली यांचा अर्ज आयुक्त कार्यालयाने डी विभागाच्या जलखात्याकडे हस्तांतरित केला. जल खात्याने अर्ज करनिर्धारक व संकलक खात्याकडे हस्तांतरित केला. नंतर गलगलींना 31 मार्च 2024पर्यंतची माहिती देण्यात आली. 1 एप्रिल 2010पासून 31 मार्च 2023पर्यंतची थकबाकी 3.89 लाख होती. तसेच 1 एप्रिल 2023पासून 31 मार्च 2024पर्यंतचे चालू बिल देयक 67, 278 इतके आहे. यात सर्वसाधारण तसेच जल कराचा समावेश आहे. विशेष म्हणजे तेथे जलमापकविरहित जलजोडणी आहे, असेही गलगलींना दिलेल्या माहितीत पालिकेने म्हटले होते.

पालिकेने आयुक्तांच्या बंगल्याच्या करातल्या थकबाकीचा उल्लेख टाळत एकंदरीत देयक भरण्याची मुदत संपायला वेळ असल्याचे नमूद करत ती येत्या २-३ दिवसांत जमा केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content