Homeएनसर्कलएन ९५ला पर्यायः...

एन ९५ला पर्यायः अनेक पदरी हायब्रिड फेस मास्क!

कोविडच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये मास्क नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावते. त्यातच एन ९५ रेस्पिएटर मास्क, हे फार उपयुक्त मानले जातात. आता याच एन ९५ मास्कला पर्याय देणारे अनेक पदरी हायब्रिड फेस मास्क उपलब्ध झाले आहेत.

कोविड-19 या महामारीने  सर्व  मानवजातीसमोर दुर्व्यवस्थेची स्थिती निर्माण केली आहे. या परिस्थितीविरूद्ध संरक्षण करण्याची पहिली पायरी म्हणजे  सॅनिटायझर्स, फेस मास्क यांचा वापर आणि कोविडयोग्य वर्तन आहे. कोविड-१९चा संसर्ग होण्यापासून रक्षण करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फेसमास्कची शिफारस केली आहे. खासकरुन एन ९५ प्रकारचे मास्क संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून संसर्ग न झालेल्या व्यक्तीकडे कोविड-१९ विषाणूंचे संक्रमण कमी करण्यासाठी अधिक प्रभावी मानले गेले आहेत. परंतु एन ९५ फेस मास्कचा वापर करणे बर्‍याच जणांना आरामदायक वाटत नाही, तसेच बहुतेकदा ते धुता येत नाहीत.

परीशोधन टेक्नोलॉजीज प्रा. लिमिटेडला अनेक पदरी हायब्रीड फेस मास्क, एसएचजी-९५ ® (बिलियन सोशल मास्क) विकसित करण्यासाठी, जलदगती कोविड-१९ निधीअंतर्गत बिराक अर्थात जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परीषदेने आणि आयकेपी नॉलेज पार्क यांनी अंशतः सहाय्य केले. हे पूर्णतः भारतीय बनावटीचे मास्क, हवेतील आकाराने मोठे  कण (> ९०%) आणि बॅक्टेरिया जंतू गाळण्याच्या  प्रक्रियेत(> ९९%) इतकी उच्च कार्यक्षमता प्रदान करतात.

हे मास्क व्यवस्थित  श्वासोच्छ्वास घेणे सुनिश्चित करतात. कानाच्या पाळ्यांसाठी आरामदायक आहेत तसेच ते पूर्णपणे हाताने विणलेल्या कापसापासून तयार केले असल्याकारणाने उष्णकटिबंधीय परिस्थितीतदेखील वापरण्यास सोयीस्कर आहेत. एक विशेष गाळण्याची सोय असलेला थर असणे, हा त्याचा आणखी एक फायदा आहे. या हाताने धुण्यायोग्य आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या फेस मास्कची किंमत, कंपनीकडून प्रति मास्क अंदाजे ५० ते ७५ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

सुमारे १४५०००हून अधिक मास्कची विक्री केलेला, हा उपक्रम कोविडच्या कालावधीतील मागण्या पूर्ण करणारा, अनेक स्वयं-मदत गटांच्या (एसएचजी) उदरनिर्वाह विकसित करण्यासाठी, उपयोगी पडत असून ग्रँड चॅलेंज कॅनडाद्वारे त्यास वित्तपुरवठा करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी www.dbtindia.gov.in किंवा www.birac.nic.in येथे संपर्क साधा.

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content