Homeमुंबई स्पेशलविदेशात जाणाऱ्यांसाठी सोमवार...

विदेशात जाणाऱ्यांसाठी सोमवार ते शनिवार लसीकरण!

शैक्षणिक कारणांसाठी, नोकरीसाठी तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी विदेशी जाणाऱ्या व्यक्तींना आता आठवड्यातील सोमवार ते शनिवार अशा सहापैकी कोणत्‍याही दिवशी, महानगरपालिकेने नेमून दिलेल्‍या ७ समर्पित कोविड लसीकरण केंद्रावर लस घेता येईल.

मुंबई महापालिकेने ही घोषणा केली आहे. यापूर्वी सोमवार ते बुधवार असे तीन दिवस ही मुभा होती. त्‍यामध्‍ये गुरुवार ते शनिवार अशी तीन दिवसांची सवलत वाढविण्‍यात आली आहे. ही सवलत दिनांक ३१ ऑगस्‍ट २०२१पर्यंत लागू राहणार आहे.

मुंबई महापालिकेकडून मुंबईत करी रोड येथील कस्‍तुरबा, परळ येथील केईएम, अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स, विलेपार्ले येथील डॉ. कूपर, गोवंडी येथील महानगरपालिका शताब्‍दी,  घाटकोपरमधील राजावाडी रूग्णालय आणि दहिसर जम्‍बो कोविड सेंटर, या सात ठिकाणी विदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि ऑलिम्पिक खेळाडू यांच्‍यासाठी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.

शैक्षणिक कारणासाठी, नोकरीसाठी आंतरराष्‍ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांनी किंवा टोकियो (जपान)मध्‍ये नियोजित ऑलिम्पिक क्रीडा स्‍पर्धांसाठी जाणाऱ्या खेळाडूंच्‍या लसीकरणामध्‍ये केंद्र सरकारच्‍या विविध निर्देशानुसार सुलभता आणली जात आहे. अशा नागरिकांनी कोविशिल्‍ड लसीचा पहिला डोस घेतल्‍यानंतर ८४ दिवस पूर्ण होण्‍यापूर्वीच, त्‍यांना विदेशात जाणे अत्‍यावश्‍यक असल्‍यास, पहिला डोस घेतल्‍यानंतर किमान २८ दिवसांचे अंतर पूर्ण झाले असल्‍यास दुसरा डोस मिळू शकतो.

संबंधित नागरिकाच्‍या लसीकरण प्रमाणपत्रावर आता त्‍यांचा पारपत्र (पासपोर्ट)चा क्रमांकदेखील नोंदवला जातो. जागतिक आरोग्‍य संघटनेने कोविशिल्‍ड ही लस आपत्‍कालीन वापरासाठी मान्‍य केल्‍याने लस प्रमाणपत्रावर कोविशिल्‍ड या लसीचा उल्‍लेख आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी पुरेसा आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content