Thursday, November 7, 2024
Homeन्यूज ॲट अ ग्लांसखासदार सुप्रिया सुळेंचा...

खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक!

लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दुपारी एक वाजता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, “अत्यंत महत्त्वाचे” असं म्हणत मोबाईल हॅक झाल्याची माहिती दिली.

“माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी”, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. थेट पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेल्याने यामागील व्यक्तींच्या नावासंदर्भात लवकरच खुलासा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांचे डिजीटल डिव्हाईस हॅक करण्याचा व त्यावरील माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने त्यामध्ये वेगवेगळ्या ट्रोजनच्या माध्यमातून घुसखोरी करण्याचे आरोप झाले आहेत.

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content