Wednesday, January 15, 2025
Homeकल्चर +राज्य नाट्य स्पर्धेच्या...

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत माझ्या बायकोचा नवरा, मर्डरवाले कुलकर्णी!

सन २०२३-२४ यावर्षी घेण्यात आलेल्या ३४व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी माझ्या बायकोचा नवरा, मर्डरवाले कुलकर्णी यांच्यासह दहा नाटकांची निवड करण्यात आली आहे.

सन २०२३-२४ यावर्षी घेण्यात आलेल्या ३४व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निकालाची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या स्पर्धेत एकूण २४ व्यावसायिक नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी खालीलप्रमाणे दहा नाटकांची निवड करण्यात आलेली आहे.

गालिब (मल्हार), माझ्या बायकोचा नवरा (भद्रकाली प्रॉडक्शन), जन्मवारी (सेवन स्टुडिओज आर्ट), चाणक्य (अभिजात क्रिएशन्स), 217 पद्मिनी धाम (प्रग्यास किएशन्स), जर तर ची गोष्ट (सोनल प्रॉडक्शन्स), मी नथुराम गोडसे बोलतोय (माऊली प्रॉडकशन्स), अस्तित्त्व (भरत जाधव एंटरटेनमेंट), मर्डरवाले कुलकर्णी (अष्टविनायक), यदा कदाचित रिटन्स (भूमिका व सोहम).

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रकाश निमकर, विजय टाकळे आणि प्रसाद ठोसर यांनी काम पाहिले. या स्पर्धेची अंतिम फेरी लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. 

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content