Monday, December 23, 2024
Homeहेल्थ इज वेल्थअधिकाधिक ऑक्सिजन पुरवणारे...

अधिकाधिक ऑक्सिजन पुरवणारे उपकरण तयार!

संपूर्ण देश सध्या कोविड महामारीच्या अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन दिला जात आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक आणि इतर समस्यांमुळे पुरवठा साखळीत निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी CSIR-CMERI ने ‘ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा करणारे- ऑक्सिजन एन्रीचमेंट युनिटचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

काल या संस्थेने हे तंत्रज्ञान हैदराबादच्या कुशाईगुडा येथील मेसर्स अपोलो कॉम्प्युटिंग लॅबोरेटरी प्रा. लिमिटेडला हस्तांतरित केले. या विभागाच्या उभारणीसाठी तेलमुक्त प्रतिसादात्मक कॉम्प्रेसर, ऑक्सिजन ग्रेड जिओलाईट चाळणी आणि न्यूमेटिक म्हणजेच हवेच्या दाबावर चालणारे घटक आवश्यक आहेत, अशी माहिती CSIR-CMERI चे संचालक डॉ. हरीश हिरानी यांनी दिली.

या उपकरणाद्वारे, 15 LPM रेंजपर्यंत वैद्यकीय वायू सोडला जाऊ शकतो तसेच त्यातील ऑक्सिजनची शुद्धता 90%पेक्षा अधिक आहे. गरज पडल्यास, या उपकरणातून, 70 LPM रेंजपर्यंतचा 30 टक्के शुद्धता असलेला ऑक्सिजनही सोडता येईल. विलगीकरण कक्षात, जिथे रुग्णांना ऑक्सिजनची आत्यंतिक गरज आहे, अशा ठिकाणी हे उपकरण कामी येऊ शकेल. यामुळे दूरच्या तसेच जास्तीतजास्त ठिकाणांपर्यंत गरजूंना ऑक्सिजन पुरवणे शक्य होईल. एका ठिकाणी हे उपकरण लावून त्याद्वारे विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून विविध ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

एक पल्स डोस (pulse dose) विकसित करण्यासाठीचे संशोधनही सध्या सुरू आहे. या उपकरणाद्वारे रूग्णाची श्वासोच्छवासाची पद्धत जाणून घेता येईल आणि त्यानुसार केवळ श्वास घेताना ऑक्सिजन सोडता येईल. यामुळे ऑक्सिजनची मागणी 50 टक्क्यांनी कमी होऊ शकेल असा दावा त्यांनी केला.

तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून या ऑक्सिजन एन्रीचमेंट युनिटचे उत्पादन करण्यासाठी  CSIR-CMERI ने भारतीय कंपन्या/उत्पादन संस्था/एमएसएमई/स्टार्ट अप कंपन्यांकडून इरादापत्रे मागवली आहेत.

तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यक्रमाच्या वेळी अपोलो कॉम्प्युटिंग लेबॉरेटरी प्रायव्हेट लिमिटेडचे जयपाल रेड्डी यांनी सांगितले की, या उपकरणाची पहिली प्रतिकृती 10 दिवसांत विकसित केली जाईल आणि त्यानंतर मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून पूर्ण उत्पादन सुरू होईल. सध्या त्यांच्याकडे दिवसाला अशी 300 उपकरणे तयार करण्याची क्षमता आहे. याशिवाय ऑक्सिजन एन्रीचमेंट युनिटच्या स्वातंत्र्य उत्पादनासोबतच, CSIR-NAL ने विकसित केलेल्या स्वच्छ वायू तंत्रज्ञानाच्या मदतीने एकत्रित उपकरण बनवण्याचा त्यांचा विचार आहे.

छोट्या अतिदक्षता विभागांमध्ये हे युनिट्स उपयुक्त ठरतील. दुर्गम गावातील छोटी रुग्णालये आणि अलगीकरण कक्षांमध्ये रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागवण्याकरीता या युनिट्सचा उपयोग होईल. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सच्या वापरातून ऑक्सिजनचा अधिकाधिक उपयोग करून घेता येईल. कोविड रुग्णांना सुरुवातीलाच ही सुविधा दिली तर रुग्णांना व्हेंटीलेटर्सवर ठेवण्याची गरज पडणार नाही. ऑक्सिजन सिलेंडरशी संबंधित धोके लक्षात घेतल्यास, असा प्रकारच्या उपकरणांचा वापर अधिक सुरक्षित ठरू शकेल.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content