Homeबॅक पेजइरेडाने जाहीर केला...

इरेडाने जाहीर केला 1,699 कोटींचा निव्वळ नफा!

एनबीएफसी आणि बँकिंग क्षेत्रातील लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करणारी ठरली पहिली कंपनी ठरतानाच भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने (इरेडा) 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक 1,699 कोटी रुपयांचा करपश्चात म्हणजेच निव्वळ नफा जाहीर केला आहे.

कंपनीने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी त्यांचे ऑडिटेड स्टँडअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक अहवाल जाहीर केले असून ते प्रमुख आर्थिक निर्देशकांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवितात. कंपनीने आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक करपश्चात नफा 1,699 कोटी रुपये नोंदवला आहे. देशातली सर्वात मोठी केवळ हरित वित्तपुरवठा करणारी एनबीएफसी अर्थात बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून इरेडाने केवळ 15 दिवसांत त्यांचे लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करून पुन्हा एकदा उद्योग मानके प्रस्थापित केली आहेत. या कामगिरीमुळे इरेडा केवळ 15 दिवसांत लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करणारी एनबीएफसी आणि बँकिंग क्षेत्रातील पहिली कंपनी आणि पहिली सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (पीएसयू) ठरली आहे.

काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत इरेडाच्या संचालक मंडळाने कंपनीच्या 31 मार्च 2025ला संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी ऑडिटेड स्टँडअलोन आणि एकत्रित आर्थिक निकालांना मान्यता दिली. आर्थिक वर्ष 2023-24च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25मध्ये करपश्चात नफा 1,699 कोटी (↑36%), करपूर्व नफा 2,104 कोटी (↑25%), परिचालनाद्वारे महसूल 6,742 कोटी (↑36%), निव्वळ मूल्य 10,266 कोटी (↑20%) आणि कर्ज खातेवही 76,282 कोटी (↑28%) इतकी आढळून आली आहे.

निकालांवर भाष्य करताना, इरेडाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास म्हणाले की, इरेडाची महसूल, नफा आणि कर्ज खातेवहीतील सातत्यपूर्ण वाढ भारताच्या नवीकरणीय ऊर्जेसाठी वित्तपुरवठा करण्याचा आमचा धोरणात्मक दृष्टिकोन अधोरेखित करते. धोरणात्मक भागीदारीद्वारे भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणाला सक्षम बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

Continue reading

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये...

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक...

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...
Skip to content