Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या मावा-मिठाईच्या दुकानांची...

मुंबईतल्या मावा-मिठाईच्या दुकानांची वर्षाखेरपर्यंत होणार कसून चौकशी

येत्या सण-उत्सवांच्या कालावधीत मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नये म्हणून खाद्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करतानाच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातल्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक त्यांच्या आपापल्या कार्यकक्षेतील मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करावी, असे निर्देश दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते सण-उत्सवांच्या कालावधीत विशेष खबरदारी घेत असते. त्याच अनुषंगाने मुंबई शहरात मावा-मिठाई विकणाऱ्या दुकानांची, आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना विषबाधा होऊ नये म्हणून पालिकेचे सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

सणासुदीच्या कालावधीत अन्न विषबाधासारखी कोणतीही घटना घडणार नाही यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आपआपल्या विभागांत मिठाई विषबाधेबाबतची भीत्तीपत्रकांचे वाटप करावे व जनजागृती करावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे. मिठाईचा रंग बदलत असल्यास / उग्र वास येत असल्यास अथवा बुरशी दिसल्यास अशा मिठाई पदार्थांचे सेवन करू नये व असे पदार्थ आढळल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याच्या विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content