Homeमुंबई स्पेशलउद्या मुंबईत रिपब्लिकन...

उद्या मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा महामेळावा

रिपब्लिकन पक्षाच्या महामेळाव्यास राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सामील होऊन रिपब्लिकन पक्षाचे मुंबईतील शक्तिप्रदर्शन घडवा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशचा भव्य मेळावा येत्या दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार पुनम महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन करतील. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे उपस्थित राहतील.

येत्या दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या महामेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुका, नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे २ आमदार निवडून आल्याने रिपब्लिकन पक्षामध्ये चैतन्याचे वातावरण असून रिपब्लिकन कार्यकर्ते उत्साहाने मुंबई प्रदेशच्या मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाचे शक्तप्रिदर्शन घडवतील, असा विश्वास यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content