Homeकल्चर +‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात...

‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर..

चिंगारी या भारतातील प्राइम व्हिडिओ-शेअरींग अॅपने आज कडक एंटरटेनमेंटसोबत करार केल्याची घोषणा केली. श्रुती अक्षय मुनोत आणि मयुरी स्वप्नील मुनोत या दोन महिला उद्योजिकांनी स्थापन केलेल्या कडक एंटरटेनमेंटने तीन महान प्रॉपर्टी तयार केल्या असून त्याद्वारे मराठी प्रेक्षकांसाठी विविध विषय आणि शैलींचा कंटेंट प्रदान केला जातो.

या अनोख्या जोडीच्या नव्या कामगिरीचा लाभ चिंगारीवर घेता येईल तसेच या भागीदारीतून प्रादेशिक कन्टेन्ट लायब्ररीही अधिक समृद्ध केली जाईल. हे शॉर्ट व्हिडिओ अॅप प्रादेशिक अस्तित्त्व अधिक बळकट करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. कडक एंटरटेनमेंटसोबतची ही भागीदारी म्हणजे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

चिंगारी अॅपचे सह संस्थापक आणि सीईओ सुमित घोष म्हणाले की, रुढी-प्रथा मोडत, आमच्या यूझर्ससाठी सर्वोच्च क्षमतेने उत्कृष्ट मनोरंजन पुरवणे, ही चिंगारीची ब्रँड फिलॉसॉफी आहे. कडक एंटरटेनमेंटची तत्त्वेही अशीच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही स्वाभाविकरित्या जोडले जाऊ शकतो. त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.

कडक एंटरटेनमेंटच्या श्रुती अक्षय मुनोत आणि मयुरी स्वप्निल मुनोत म्हणाल्या की, ही भागीदारी करताना, विशेषत: विनोदी कन्टेन्टसाठी आम्ही खूप उत्साही आहोत. कडक मराठीकडे कन्टेन्ट निर्मितीसाठी अनेक योजना असल्याने चिंगारीच्या यूझर्सचे आणखी मनोरंजन होईल, याची आम्ही खात्री देतो. चिंगारी अॅपसोबत अनेक उपक्रमही आम्ही राबवणार आहोत. जास्तीतजास्त लोकांपर्यंत जास्तीतजास्त मनोरंजनाकरिता कडक मराठीचा ताजा कन्टेन्ट चिंगारी अॅपच्या विस्तृत ग्राहकवर्गापर्यंत पोहोचेल. प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कन्टेन्ट देण्यासाठी दीर्घकालीन संबंधांची ही एक महत्त्वपूर्ण सुरुवात आहे.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content