Homeचिट चॅटमराठी भाषा दिनानिमित्त...

मराठी भाषा दिनानिमित्त दादर धुरु हॉलमध्ये गुरूवारी कार्यक्रम

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, धुरु हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरूवारी, दिनांक २७ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता दादरच्या छबीलदास रोडवरील धुरु हॉल येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, कामगार नेते दिवाकर दळवी हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त’ या विषयावर ३० वर्षे संगणक क्षेत्रात अध्यापन करणारे प्रसिद्ध भानुदास साटम यांचे व्याख्यान यावेळी होणार आहे. त्याचप्रमाणे संघाच्या

वतीने घेण्यात आलेल्या आणि महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून तसेच अमेरिका, शिकागो, सिंगापूर येथून आलेल्या ४९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा तसेच “अभिजात मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया” या लेखस्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चितळे बंधू उद्योगाचे सहकार्य लाभले आहे.

अधिक माहितीसाठी संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्याशी ९३२३११७७०४ संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.

Continue reading

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

राज्यातील साखर आयुक्तपदातील सावळागोंधळ सुरूच आहे. साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांचीही सहा महिन्यातच बदली करण्यात आली आहे. काल उशिरा जारी आदेशानुसार, त्यांची मुंबईत कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी राज्याचा ऊसगाळप हंगाम सुरू असतानाच फेब्रुवारीमध्ये...

शनिवारपासून मुंबईतली मोनोरेल तात्पुरती बंद!

मुंबई मोनोरेल भविष्यासाठी अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह बनवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) येत्या 20 सप्टेंबर 2025पासून मोनोरेलची सेवा काही काळासाठी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात, नवीन "रोलिंग स्टॉक" (रॅक), प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग...

1 ऑक्टोबरपासून रेल्वे बुकिंगसाठी पहिल्या 15 मिनिटांत आधार अनिवार्य

आरक्षण प्रणालीचा लाभ सर्वप्रथम सामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावा आणि गैरवापर करणाऱ्या घटकांकडून होणारा वापर टाळ्याकरीता येत्या 1 ऑक्टोबर 2025पासून, रेल्वेच्या सामान्य आरक्षणाच्या सुरुवातीच्या पहिल्या 15 मिनिटांत, आरक्षित सामान्य तिकीट फक्त आधार-प्रमाणित वापरकर्त्यांद्वारेच केले जाऊ शकेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम...
Skip to content