Homeचिट चॅट'उमंग'मध्ये नकाशांची सुविधा...

‘उमंग’मध्ये नकाशांची सुविधा सुरू!

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने उमंग (UMANG) ऍपमध्ये नकाशांची सुविधा सुरू केली आहे. यासाठी मंत्रालयाने मॅपमायइंडिया अर्थात MapmyIndia बरोबर सामंजस्य करार केला आहे.

यामुळे आता भौगोलिकदृष्ट्या जवळपास असणाऱ्या मंडया, रक्तपेढ्या अशा अनेक सरकारी सेवासुविधा केवळ एका बटणाच्या क्लिकवर शोधून काढणे नागरिकांना शक्य होणार आहे. मॅपमायइंडियाने गल्लीबोळ आणि गावपातळीपर्यंत सर्व बारकाव्यांनिशी तयार केलेल्या व नकाशावाचन करणाऱ्याशी संवाद साधणाऱ्या तपशीलवार नकाशांवर या सुविधा पाहता येणार आहेत. ईच्छित ठिकाणापर्यंतचे अंतर, दिशादर्शन, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणाऱ्या सूचना ऐकू येणे व दृश्यात्मक मार्गदर्शन हेही यामध्ये शक्य होणार आहे. तसेच रहदारी आणि रस्तेसुरक्षाविषयक सूचनाही यामध्ये मिळू शकणार आहेत.

पुढील सेवांसाठी उमंग ऍपने यापूर्वीच मॅपमायइंडियाच्या माध्यमातून नकाशा सुविधा पुरवण्यास सुरुवात केली आहे-

  • मेरा राशन/रेशन- मॅपमायइंडियाच्या नकाशावर स्वस्त धान्य दुकाने पॉइंटर स्वरूपात दाखवलेली असल्याने, उमंगच्या मदतीने वापरकर्त्यांना त्यांच्या सर्वात जवळच्या दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी दिशा कळू शकतात.
  • इ-नाम- उमंगच्या माध्यमातून वापरकर्त्यांना ‘माझ्याजवळची मंडई/मंडी/घाऊक बाजारपेठ’ ही सुविधा मिळत असल्याने नकाशावरील पॉइंटरच्या मदतीने दिशा समजून तिचे ठिकाण नेमकेपणाने समजण्यास मदत होणार आहे.
  • दामिनी- ‘विजांच्या लखलखाटासंबंधी धोक्याची पूर्वसूचना’ देणाऱ्या या सुविधेमुळे वापरकर्त्यांना काही मिनिटांपूर्वी वीज कोसळलेल्या जवळपासच्या भागाची दृश्य स्वरूपात माहिती मिळू शकते. पूर्वसूचना देणाऱ्या या यंत्रणेमुळे वीज पडणाऱ्या संभाव्य ठिकाणाची माहिती नकाशावर दिसू शकते.

नागरिकांना अधिक उपयुक्त ठरण्यासाठी ही नकाशा-सुविधा पुढील आणखी काही सेवांसाठीही सुरू करण्यात येणार आहे-

  • ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळ- वापरकर्त्यांना ईएसआयसीची रुग्णालये/ दवाखाने वगैरे केंद्रे नकाशावर दिसून दिशा समजणे शक्य होईल.
  • इंडियन ऑइलचे जवळचे गॅसस्टेशन तसेच इंधन भरणा स्थानक (किरकोळ स्थानक तसेच वितरक दोन्ही) नकाशावर समजणे शक्य होईल.
  • एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रवासादरम्यान पथकर नाके आणि पथकराचे दर समजण्यासाठी मदत होईल.
  • एनसीआरबी अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था, जवळपास असणाऱ्या पोलीस ठाण्याची माहिती व ठिकाण नकाशावर मिळू शकेल.
  • प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (मेरी सडक)- सदर योजनेतील खराब रस्त्यांविषयीच्या तक्रारी नोंदवायचा असल्यास, मॅपमायइंडियाच्या मंचावरून तो विशिष्ट रस्ता निवडून तक्रार करणे शक्य होईल.

उमंग (UMANG) ऍप डाउनलोड करण्यासाठी 97183-97183 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. तसेच पुढील लिंक्सवरूनही हे ऍप डाउनलोड करता येईल.

1. Web: https://web.umang.gov.in/web/#/  

2. Android: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.umang.negd.g2c

3 iOS: https://apps.apple.com/in/app/umang/id1236448857

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content