Homeमुंबई स्पेशलमनोज सौनिक राज्याचे...

मनोज सौनिक राज्याचे नवे मुख्य सचिव!

राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव येत्या 30 तारखेला सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक कार्यभार स्वीकारणार आहेत.

मनोज सौनिक हा कार्यभार स्वीकारताना पुढील आदेश होईपर्यंत आपल्याकडील वित्त विभागाचा कार्यभार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळतील. राज्य शासनाने आज याबाबतचे आदेश जारी केले.

सौनिक मूळचे बिहारचे असून ते 1987च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी कलकत्ता येथील सेंट झेविअर महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापिठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. रायगड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळे येथे जिल्हाधिकारीपदी त्यांनी काम केले आहे. अमरावती विभागाचे विभागीय आयुक्तपदी काम केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शेती स्वावलंबन अभियानाचे महासंचालक म्हणून काम केले आहे. नवी दिल्लीतील सेवा कालावधीत ऊर्जा विभाग आणि संरक्षण विभागात काम केले आहे. त्यांना वस्त्रोद्योग, अल्पसंख्यांक, गृह, परिवहन, सार्वजनिक बांधकाम अशा विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

मनू कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त

येत्या 30 तारखेला राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त होत असलेले मनू कुमार श्रीवास्तव यांची महाराष्ट्राचे मुख्य सेवा हक्क आयुक्त या पदावर नेमणूक केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होतील, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत ते या पदावर असतील.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content