Homeचिट चॅटॲड. शशिकला रेवणकर...

ॲड. शशिकला रेवणकर यांना पुत्रशोक

अंबरनाथ येथील प्रथितयश वकील शशिकला रेवणकर यांचे द्वितीय पुत्र मनोज रामकृष्ण रेवणकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बेळगाव मुक्कामी नुकतेच निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, मोठे बंधू दीपक, वहिनी दीपा, पुतणे गौरव आणि यश असा परिवार आहे.

शशिकला रेवणकर आपल्या मोठ्या मुलाच्या कुटुंबासह अंबरनाथ येथे वास्तव्यास आहेत तर धाकटा मुलगा मनोज आपल्या परिवारासह बेळगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून राहात होता. सुवर्णकार म्हणून सोन्या-चांदीचे दागिने घडविण्याचे काम करीत होता. नुकताच मनोज याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.

पतीच्या निधनानंतर शशिकला रेवणकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि वकिलीची सनद घेतली. दोन्ही मुलांना आपापल्या पायावर उभे केले. मोठा मुलगा दीपक इंजिनिअर तर धाकटा मनोज सुवर्णकार म्हणून नावारुपाला आले. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने झटत असतानाच काळाने त्यांच्या धाकट्या मुलाला हिरावून नेले. बेळगावातच त्याचा मोठा भाऊ दीपक यानेच मनोजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content