Homeडेली पल्समुंबईत उद्यापासून महासंस्कृती...

मुंबईत उद्यापासून महासंस्कृती महोत्सव!

महाराष्ट्राचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्यावतीने महासंस्कृती महोत्सव 2024चे आयोजन काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदान येथे उद्यापासून 26 फेब्रुवारी, या कालावधीत करण्यात आले आहे. उद्या गुरुवार, दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सलग पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार असून सर्वांनी या महोत्सवातील कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल  आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महोत्सवात विविध प्रदर्शन दालने, रंगमंचावरील सांस्कृतीक कार्यक्रम व मर्दानी खेळ असणार आहेत.  प्रदर्शन दालनात शिवकालीन शस्त्रे, नाणी व हस्तलिखिते, शिवसंस्कार काव्य दालन, स्वराज्य ते साम्राज्य या आर्ट गॅलरीचा समावेश करण्यात आला आहे.

महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात नृत्यवंदना कार्यक्रम होणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी 7 वाजता जल्लोष या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता लेझीम व मर्दानी खेळ, तर सायंकाळी 7.00 वाजता मराठी लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता मल्लखांब, सायं. 5.00 वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव, सायंकाळी 7 वाजता सप्तरंग, या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दशावतार, या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी 7.00 वाजता शिववंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता पारंपरिक नृत्य व मर्दानी खेळ तर सायंकाळी 7.00 वाजता मराठी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content