Homeपब्लिक फिगरव्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात...

व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प!

राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना काल दिल्या. यावेळी राज्यातील वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची मदत घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात वन्यजीवांच्या वाढत्या उपद्रवासंदर्भात चर्चा करण्यासाठी नुकतीच सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, वनबलप्रमुख वाय. एल.पी.राव, प्रधान मुख्यवनसंरक्षक महिप गुप्ता, गुरुप्रसाद आदी अधिकारी उपस्थित होते.

वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणाऱ्या नुकसानाच्या समस्येवर केवळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई हा उपाय नाही. वन्य प्राण्यांना विशेषतः हत्तींना गावापर्यंत, शेतांपर्यंत येण्यापासून रोखण्यासाठी काय योजना करता येतील याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी हत्ती संवादकाची मदत घेता येईल, असेही त्यांनी सुचविले. यावेळी देशातील नऊ राज्यात वन्य हत्तींशी संवाद साधून त्यांना नियंत्रित करणारे प्राणी संवादक आनंद शिंदे यांच्या कामांविषयी सादरीकरणही करण्यात आले.

हत्तींना गावापर्यंत येण्यास रोखण्यासाठी ‘एलिफंट प्रूफ फेन्स’ अर्थात एपीएफकरिता मनरेगा योजनेतून निधी मिळावा या दृष्टीने केंद्राकडे पाठपुरावा करण्यात यावा. पर्यावरण व वन्यजीव संवर्धनासाठी देशातील उद्योग जगताकडून मिळणाऱ्या सामाजिक उत्तर दायित्व (सीएसआर) निधीपैकी शून्य पूर्णांक पाच टक्के निधी देणे बंधनकारक करावे, अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात येईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.

जंगलातील झाडे कटाईबाबत परवानगी देताना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि ऑफलाईन परवानगी बंद करण्याचे निर्देश वनमंत्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. कोल्हापूर जिल्ह्यात गवा, या प्राण्यांचा उपद्रव गंभीर असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त करुन लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांशी संवाद वाढविण्याच्या सूचना दिल्या.

Continue reading

बंगालमध्ये राजकीय ‘ग्रँड स्लॅम’! लिएंडर पेसला भाजपमध्ये ‘स्पेस’!!

भारताचा दिग्गज टेनिसपटू आणि 'कोलकाता बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिएंडर पेस याने मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून राजकीय खळबळ उडवली. बंगाली माध्यमांच्या मते, २०२१मध्ये गोव्यात ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश करणाऱ्या पेसने आता 'घासफूल'...

केरळमध्ये डाव्या आघाडीच्या सरकारसाठी मोदी प्रयत्नशील!

केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कन्नूर येथील जाहीर सभेत सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळमध्ये डाव्या आघाडीचे...

नव्या बदलांसह ‘दिवाळखोरी’ लोकसभेत मंजूर!

लोकसभेने काल इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (संशोधन) विधेयक, २०२५ दुरुस्त्यांसह मंजूर केले. वित्त व कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या या विधेयकात १२ महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे विधेयक आता राज्यसभेकडे जाणार आहे, पण लोकसभेतील मंजुरीने...
Skip to content