Friday, October 18, 2024
Homeबॅक पेजग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये मध्य प्रदेश...

ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये मध्य प्रदेश झळकला!

राज्यातील पर्यटनस्थळांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार व्हावा आणि परदेशी पर्यटकांची संख्या वाढावी, याउद्देशाने जयपूर येथे ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारचे (जीआयटीबी) नुकतेच आयोजन करण्यात आले. यामध्ये मध्य प्रदेश पर्यटन मंडळाचीही भागीदारी होती.

राजस्थान सरकारचा पर्यटन विभाग आणि भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियनचेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने जीआयटीबीचे आयोजन करण्यात  आले होते. अमेरिका, कॅनडा, युरोपीय देश ब्रिटन, स्पेन, जर्मनी, पोलंड, रशिया, फ्रान्स, इटली आणि व्हिएतनाम, फिलिपाईन्स, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस यासारख्या आग्नेय देशांमधील विविध भागधारकांसमवेत बी टू बी (बिझनेस २ बिझनेस) बैठकांमध्ये त्यांनी त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि मोहक लँडस्केप तसेच पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांची माहिती दिली.

ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये मध्य प्रदेश टुरिझमने ग्वाल्हेर आणि मांडूच्या भव्य किल्ल्यांपासून  भोपाळच्या शांत तलावांपर्यंत आणि कान्हा आणि बांधवगडच्या घनदाट जंगलांपर्यंत आपला समृद्ध वारसा दाखवला. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक बिदिशा मुखर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली मध्य प्रदेश पर्यटन शिष्टमंडळाने ट्रॅव्हल उद्योग व्यावसायिक, टूर ऑपरेटर आणि अभ्यागतांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील अद्वितीय आकर्षणे आणि अनुभवात्मक पर्यटनसंधींची माहिती दिली. संवाद सत्रे आणि सादरीकरणाच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील सांस्कृतिक वारसा,  वन्यजीव अभयारण्य, तीर्थक्षेत्रे आणि साहसी पर्यटनातील कामगिरी, इव्हेंट्स आणि साहस पर्यटनाची  माहिती देण्यात आली.

मुखर्जी यांनी परदेशी पर्यटकांना रिस्पॉन्सिबल टुरिझम मिशन अंतर्गत मंडळातर्फे चालविल्या जाणाऱ्या  महिलांसाठी सुरक्षित पर्यटनाची आणि राज्यातील ओरछा, खजुराहो, चंदेरी, महेश्वर आणि मांडू हे ‘वेडिंग डेस्टिनेशन’चे प्रमुख ठिकाण बनविण्यासाठी मंडळाच्या प्रयत्नांची माहिती दिली. यावर्षी ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत इनबाउंड टूर ऑपरेटर्सची सर्वात मोठी संस्था असलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सची (आयएटीओ) वार्षिक परिषद मध्य प्रदेश आयोजित करणार आहे. भोपाळमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आम्ही जीआयटीबीमध्ये मध्य प्रदेशच्या अविस्मरणीय विविधतेचे प्रदर्शन केले आहे. भीमबेटकामध्ये  प्राचीन लेण्यांपासून ते आपल्या राष्ट्रीय उद्यानातील थरारक वन्यजीव सफारीपर्यंतच्या अनुभवांचा खजिना आहे. आमचा वारसा जपणाऱ्या आणि स्थानिक समुदायांना लाभ देणाऱ्या जबाबदार पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.

इको फ्रेंडली पर्यटनासाठी उत्साह

मध्य प्रदेशातील आयबाऊंड टूर ऑपरेटर्समध्ये खूप स्पर्धा आहे. इको फ्रेंडली पर्यटन उपक्रमांबाबत प्रचंड उत्साह होता. मध्य प्रदेश, मांडू, महेश्वर, ग्वाल्हेर, खजुराहो आणि विविध व्याघ्र प्रकल्पातील होम स्टे प्रकल्प परदेशी पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. पण यंदा ऑफबीट  डेस्टिनेशनलाही प्रमोट करण्यात आले आहे. ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमधील सहभागामुळे मध्य प्रदेश टुरिझमने टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजन्सी आणि पर्यटन उद्योगातील भागधारकांशी नवीन भागीदारी  करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. संयुक्त प्रयत्नांद्वारे जागतिक पर्यटन नकाशावर आपली ओळख  वाढविणे आणि एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून स्वतःला प्रस्थापित करणे हे राज्याचे उद्दीष्ट आहे, असेही मुखर्जी म्हणाल्या.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content