Homeबॅक पेजलुफ्तान्साची हैदराबाद ते...

लुफ्तान्साची हैदराबाद ते फ्रँकफर्ट थेट विमानसेवा सुरू!

भारताप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ करत आणि उपखंडातील आपल्या अस्तित्त्वास अधिक बळकटी देत लुफ्तान्सा जर्मन एअरलाइन्सने भारतीय राज्य तेलंगणाची राजधानी हैदराबाद आणि फ्रँकफर्ट, जर्मनी यांच्यातील थेट विमानसेवेची घोषणा केली आहे. हैदराबादला युरोपशी जोडणारी ही नवीन सेवा १७ जानेवारी २०२४पासून सुरू करण्यात आली आहे. यात प्रवाशांना नव्या ७८७ ड्रीमलायनर विमानातील प्रवासात अद्ययावत सुविधांसह प्रवासाचा अनुभव घेता येईल.

भारतातील एक अग्रगण्य युरोपियन विमान कंपनी असलेल्या लुफ्तान्साची विमानसेवा देशातील पाच ठिकाणांशी थेट जोडलेली आहे. आणि आता कंपनीच्या वैश्विक जाळ्यामध्ये नव्या हैदराबाद-फ्रँकफर्ट विमानसेवेची भर पडली आहे. लुफ्तान्सासाठीची जागतिक स्तरावरील सर्वात वेगाने विकसित होणारी बाजारपेठ म्हणून भारताच्या क्षमतेमध्ये पॅनडेमिक-पूर्व पातळीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

लुफ्तान्सा समुहाचे दक्षिण आशियासाठीचे सीनिअर डिरेक्टर जॉर्ज एट्टीयिल यांनी सांगितले की, आमच्या हैदराबाद-फ्रँकफर्ट, या नव्या सेवेसह आता आम्ही भारतीय प्रवाशांना युरोपातील आमच्या मध्यवर्ती ठिकाणांना व त्यापुढेही युरोपीय खंडातील सर्वात मोठ्या नेटवर्कशी जोडणाऱ्या प्रती आठवडा ६४ फ्लाइट्स पुरवित आहोत. हैदराबादशी जोडणारी विमानसेवा सुरू केल्यानंतर आमच्या भारतातील क्षमतेमध्ये १४ टक्‍के (२०१९च्या तुलनेत) वाढ झाली आहे, ज्यामुळे लुफ्तान्सासाठी ही सर्वात वेगाने विस्तारणारी प्रमुख बाजारपेठ ठरली आहे. दक्षिण भारताचे वाढते महत्त्व ओळखून आणि लुफ्तान्सा समुहासाठी भारताचे एकूणच किती अधिक महत्त्व आहे हे दाखवून देत बेंगळुरू-म्युनिच सेवा आणि आता हैदराबाद-फ्रँकफर्ट सेवा यांच्यासह गेल्या तीन महिन्यांमध्ये आम्ही २ नवे मार्ग सुरू केले आहेत.

भारतात ७००हून अधिक कर्मचारी असलेली व ६० वर्षांहून अधिक काळाचा वारसा लाभलेली लुफ्तान्सा कंपनी भारताच्या सातत्यपूर्ण विकासगाथेचा अविभाज्य भाग बनण्याप्रती कटिबद्ध आहे.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content