Friday, November 22, 2024
Homeकल्चर +संदीप खरेंच्या आवाजात...

संदीप खरेंच्या आवाजात ऐका ‘मी.. कालिदास’!

आषाढस्य प्रथम दिवसे.. म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे कारण कवी कालिदासाने मेघदूत हे अजरामर काव्य लिहिले. हा दिवस रविवारी ११ जुलै रोजी येत आहे. ‘स्टोरीटेल मराठी’ने यानिमित्ताने ‘मी.. कालिदास’ ही डॉ. मंगला मिरासदार लिखित चरित्रात्मक कादंबरी ऑडिओबुक स्वरूपात प्रकाशित करत आहे. लोकप्रिय कवी, गायक आणि अभिनेता संदीप खरे यांच्या गोड आवाजात ‘मी.. कालिदास’ ऐकणं ही रसिक श्रोत्यांसाठी आणखी एक पर्वणी आहे.

भारतभूमीच्या इतिहासात रसिकांच्या हृदयावर विराजमान झालेले एक अनोखे व्यक्तिमत्व म्हणजे कालिदास. काव्य, नाट्य, शृंगार आदी नऊ रसांनी बहरलेल्या वाङ्मयीन कलाकृती निर्माण करणारा कालिदास हा सदैव सर्व रसिकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. त्याचे जीवन समजून घेणे सोपे नसले तरी मंगला मिरासदार यांनी लिहिलेल्या ‘मी.. कालिदास’ या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्रंथामधून कालिदासाच्या जीवनप्रवासाची ओळख करुन घेण्याची संधी या ऑडिओबुकमध्ये रसिक श्रोत्यांना लाभली आहे.

कालिदासाबद्दल सांगितल्या जाणार्‍या आख्यायिकांमधून, कालिमातेने प्रसन्न होऊन त्याला प्रतिभेच्या दिव्य गुणाचे वरदान दिले, असे म्हटले जात असले तरी लेखिकेने कालिदासाच्या वेगळ्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला आहे. कालिदासाने अवगत केलेल्या काव्य व शास्त्र या कला आणि त्यातील निपुणता त्याने किती कष्टाने साध्य केली हे वाचकांसमोर आणले आहे.

कालिदास हा नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. कालिदास कधी होऊन गेला हे केवळ त्यांच्या वाङ्मयीन कलाकृतीच्या अभ्यासाने अंदाज बांधून ठरवावे लागते. असे असले तरी कालिदासाच्या काव्य – नाट्य – कलाकृती आजही मनाला भुरळ घालतात, अभ्यासल्या जातात. कालिदासाचा मेघदूत तरुण-तरुणींना आजही स्वप्नमय दुनियेत घेऊन जातो. असा कालिदास अभ्यासणे सोपे नाही. मंगला मिरासदार यांनी आपल्या लेखनशैलीने सर्वांना समजणाऱ्या कादंबरीच्या परिभाषेत तो प्रस्तुत केला आहे.

‘मी.. कालिदास’ या अत्यंत वेगळ्या आणि वैशिट्यपूर्ण कादंबरीच्या लेखिका डॉ. मंगला मिरासदार पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत विषयाच्या प्राध्यापक होत्या. कौटिल्य अर्थशास्त्राच्या तज्ज्ञ म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांनी ‘मी.. कालिदास’सोबतच ‘श्री सत्यसाई’, ‘घोषवती’, ‘राजमुद्रा अर्थात मुद्राक्षसम’, ‘कथा सुभाषितांच्या’, ‘कौटिलीय अर्थशास्त्र – एक अध्ययन’ तसेच इंग्रजीतील ‘द पॉलिटिकल आयडीयाज इन द पंचमहाकाव्यज’ अशा  विविध विषयांवरील ग्रंथनिर्मिती केली आहे. ११ जुलैला कालिदास दिवसाचे औचित्य साधून कालिदासांवर निस्सीम प्रेम करणारे त्यांचे चाहते या चरित्ररूपी कादंबरीचे निश्चितच स्वागत करतील. ‘मी.. कालिदास’ ऐकण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content