Homeमुंबई स्पेशलविधिमंडळाचे अधिवेशन ठरल्याप्रमाणे...

विधिमंडळाचे अधिवेशन ठरल्याप्रमाणे ४ ऑगस्टपर्यंत!

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्टपर्यंत कामकाज सुरू राहणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

आज मुंबईत विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, मुंबई येथील आझाद मैदानात गिरणी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात यावी अशी सूचना त्यांनी या बैठकीत केली.

या बैठकीत समितीने विचारविनिमय करून सभागृहाचे कामकाज पुढील प्रमाणे असावे असा निर्णय घेतला.

  • शुक्रवार, दिनांक २८ जुलै, २०२३ रोजी शासकीय कामकाज व अशासकीय कामकाज (विधेयके) होईल.
  • शनिवार, दिनांक २९ जुलै, २०२३ (शासकीय सुट्टी)
  • रविवार, दिनांक ३० जुलै, २०२३ (शासकीय सुट्टी)
  • सोमवार, दिनांक ३१ जुलै, २०२३ (सभागृहाची बैठक होणार नाही.)
  • मंगळवार, दिनांक १ ऑगस्ट, २०२३ (पंतप्रधान महोदयांचा पुणे दौरा असल्याने) सभागृहाची बैठक होणार नाही.
  • बुधवार, दिनांक २ ऑगस्ट, २०२३, शासकीय कामकाज
  • गुरुवार, दिनांक ३ ऑगस्ट, २०२३ रोजी शासकीयक कामकाज, विरोधी पक्षाचा प्रस्ताव (अंतिम आठवडा प्रस्ताव)
  • शुक्रवार, दिनांक ४ ऑगस्ट, २०२३, शासकीय कामकाज, अशासकीय कामकाज (ठराव).

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content