Friday, November 8, 2024
Homeमाय व्हॉईसनक्कीच पाय घसरेल...

नक्कीच पाय घसरेल चिकण मातीवरून!

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी या विषयाची भुणभुण मनात सुरू झाली होती. परंतु पाच-सहा महिन्यानंतर साथ हळूहळू कमी होत गेल्याने ही भुणभुण विरून गेली. परंतु गेल्या चार-पाच महिन्यांपासून साथीने उग्र स्वरूप धारण केल्याने त्या भुणभुणची जागा नक्कीच पक्की होऊ लागली. कोरोनाच्या रुग्णांची सतत वाढणारी संख्या आणि काहीसे मृत्यूचे तांडव दररोज पाहणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात नेमके काय घडत असावे याचे कुतूहल वाटण्यापेक्षा चिंता वाटू लागली.

दररोज जीव वाचवायची करायची कसरत.. त्यात विविध उपकरणांची कमतरता.., कधी उपकरणे आहेत.. समोर सिरियस रुग्ण आहे आणि ते उपकरण चालूच होत नाही.. तेव्हाची मनाची धडधड.. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, मावशीबाई कधीतरी व्यक्त करू शकतील काय? या विचाराने डोके पोखरले होते. विविध चाचण्या करणारे प्रयोगशाळेतील कर्मचारी तंत्रज्ञ सतत बाहेर ये-जा करून शेवटी रुग्ण मृत्यूला कवटाळीत असेल.. तेव्हा त्यांना काय वाटत असेल?

इतर वेळचे वेगळे आणि साथीच्या प्रसंगी सतत असे पाहवे लागणे वेगळे!

“आता उजाडेल! 

खिन्न आंधळा अंधार

आता ओसरेल पार

लहरींत किरणांची कलाबुत मोहरेल

आता उजाडेल”

या आशेत जगणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना जितके वाईट वाटत असेल तितकेच वाईट आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटत असते हे समाजाच्या लक्षात कसे येत नाही? आरोग्य कर्मचारीही सतत बाहेर ये-जा करत असतात, डॉक्टरांशी संपर्क साधतात. त्यांची ही धावपळ काही कमी असते का? डॉक्टरांची संख्या जास्त दिसत असली तरी रुग्णांची संख्याही प्रचंड आहे. प्रत्येकाचे रिपोर्ट पाहणे, व्हेंटिलेटरवर लक्ष ठेवणे, नस मिळत नसेल तर परिचरिकेला मदत करणे, सततच्या नातेवाईकांच्या हाकेला ओ देऊन रुग्णाची कंडिशन समजावून सांगणे आणि हे केवळ एका रुग्णाचे नव्हे तर किमान 25/30 रुग्णांचे सहज..

नक्कीच

या कोरोनाच्या साथीत तर आरोग्य कर्मचारी जीव अदमरसा होईल अशा पीपीई किट्समध्ये असतात. जरी ही सर्व माणसे किट्स घालून एसीत काम करत असली तरी 24 तास किंवा 8/10 तास त्यातच राहणे किती जिकरीचे आहे ते हे किट्स घातल्यावरच समजून येईल. मुंबई, ठाण्यात व राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने कोरोना जम्बो सेंटर्स निर्माण करण्यात आली. ती सुसज्ज असली तरीही काही त्रुटी राहणारच. कारण ती काही नेहमीसारखी रुग्णालये नाहीत.

या कोरोना काळात जेजे, सेंट जॉर्ज, जीटी, कामा, केइएम, सायन, सेव्हन हिल्स, ठाण्यातील जिल्हा रुग्णालय तसेच बाळकुम येथील कोरोना रुग्णालय तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे हे मान्यच केले पाहिजे. काही ठिकाणी दुर्घटना झाल्या. परंतु त्याची कारणे वेगळी आहेत आणि अशा दुर्घटना देशात अनेक ठिकाणी झाल्या आहेत. ज्या परिचरिकांनी अनेक महिने घरापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावले तसेच ज्या डॉक्टरांनी आणि तंत्रज्ञानी अहोरात्र काम केले त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडलीच पाहिजे.

अहोरात्र मृत्यूशी जीवघेणी स्पर्धा पाहत असताना या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनावर काहीच परिणाम झाला नसेल का? यापैकी अनेकांना लस घेऊनही कोरोनाशी सामना करावा लागला आहे. अनेकजण आपल्या लहान मुलांना दूर ठेवून आपले काम करत होते.

“ही उदास संध्याकाळ,

खिन्नपणा पांघरून बसला

झुरत दूरचा माळ”

अशी उदास संध्याकाळ अनेक ठिकाणी दररोज येत होती. अशाप्रकारच्या नेहमीच्या उदासीनतेचा काहीच परिणाम तेथे काम करणाऱ्यांवर झाला नसेल का? या सर्वाचा विचार करून सर्व संबंधितांनी या सर्वांचा तणाव हलका करण्यासाठी काहीतरी ठोस उपाय करायला हवेत.

“विनाश आहे भरून भवती

इथे तिथे अन..

घराघरातून, मानमनातून

कुठे भरारी पंखामधली?

कुठे उभारी प्राणांमधली?

पूजियल्या ज्या मूर्ती..

त्यांचे दगडच झाले..”

अशी सर्वच ठिकाणी परिस्थिती असली तरी या जीवघेण्या कोरोना साथीच्या वेळी जी मंडळी दटून उभी होती त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे सरकारचे प्रथम कर्तव्य ठरते.

“हे वर्ष तुझे हॉर्मोन्स बदलणार

नक्कीच तुझाही पाय घसरेल

चिकण मातीवरून..”

Continue reading

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येप्रकरणी पोलीस अजूनही शक्यतेवरच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येला आज १५ दिवस पूर्ण होत असतानाच पोलीस मात्र अद्यापी विविध शक्यतांचीच पडताळणी करत असल्याचे दिसत आहे. वांद्रे खेरवाडी येथे बाबांची हत्त्या झाल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवसापासून पोलीस सर्वत्र 'सुपारी'चा अँगल सांगत आहेत...

बाबा सिद्दीकींची हत्त्या नेमकी झाली तरी कशासाठी?

गेल्या शनिवारी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची वांद्र्याच्या खेरनगर परिसरात रात्री हत्त्या करण्यात आली. दुर्दैवी हत्त्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. पोलिसांनी काही संशयितांना पकडले असले तरी पोलिसी सूत्रांनुसार जे चित्र जनतेपुढे आले आहे ते मात्र पूर्ण निराशाजनक आहे,...

बाबा सिद्दीकी यांना उंचावरून टिपले?

 अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येची जागा व आजूबाजूचा परिसर पाहता हल्लेखोरांना बाबा जणू 'आहेरा'सारखेच आणून दिले, असा दाट संशय येण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे असे खेरवाडी परिसरात फिरले असताना वाटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा आपले पुत्र आमदार...
Skip to content