Homeपब्लिक फिगरतिकिटे न मिळाल्याने...

तिकिटे न मिळाल्याने चाकरमान्यांचा संताप!

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत ते फुल्ल झाल्याचे दिसले. त्यामुळे हजारो कोकणवासीय चाकरमान्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेची तिकिटे उपलब्ध करून देण्याबरोबरच तिकीट आरक्षणात काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी याबाबतचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसले. चाकरमान्यांमध्ये तिकिटे न मिळाल्यामुळे तीव्र संतापाची भावना आहे. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यातच खासगी बसचालकाकडून गणपती उत्सवाच्या काळात २ ते अडीच हजार रुपयांचा दर लावला जात आहे. ही अक्षरशः लूटमार आहे. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेची तिकिटे उपलब्ध करून द्यावीत, खासगी वाहनांच्या दरांवर नियंत्रण आणावे व तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी या पत्राद्वारे केली आहे.

1 COMMENT

  1. हे तर दरवर्षीचेच रडगाणे आहे. राजकारणी , रेल्वेमंत्री म्हटले तर त्यांच्या हातातील गोष्ट आहे. पण आपण लोकांसाठीच आहोत, लोकांसाठीच काम करतो हे प्रत्येक राजकारणी मग तो स्थानिक असो किंवा दिल्लीश्वर असो, अगदी मोठमोठ्या सभा घेवून किंवा माध्यमाद्वारे सांगत असतो ते गेले कुठे? ह्यासाठी कोणी आ आंदोलन करेल का?

Comments are closed.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content