Homeमुंबई स्पेशलकोकण विभागस्तरीय ‘नमो...

कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ पुढे ढकलला!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागातंर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदूर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील  नोकरीइच्छुक युवक व युवतींकरिता ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचेदेखील आयोजन करण्यात आले असून हा मेळावा दि. २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केला जाणार असे घोषित करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव या तारखांमध्ये बदल झाला असून ठाणे येथे होणारा मेळावा २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनवेस्टर्स व इनकुबेटर्स या सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेऊन रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd  किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंकवर जाऊन उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एका पेक्षा अधिक नोकरीसाठीदेखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येवून मुलाखती देत येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

‘नमो महारोजगार’ मेळाव्याकरिता जास्तीत जास्त नोकरीच्या रिक्तपदे संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

कोकण विभागातंर्गत ठाणे, पालघर, रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content