Homeमुंबई स्पेशलराणी बागेतून पळवलेला...

राणी बागेतून पळवलेला आरव सीएसएमटीला सापडला!

मुंबईच्या भायखळा पोलीसठाण्याच्या हद्दीत असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेतून पळवण्यात आलेला आरव, हा साडेसात वर्षांचा मुलगा काही तासांतच सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, या रेल्वेस्थानकाजवळच्या परिसरात सापडल्याचे कळते.

आरव विनोद राणा नावाचा हा साडेसात वर्षांचा मुलगा आपले काका व चुलतबहिणीसह भायखळ्याच्या राणीच्या बागेत चार नोव्हेंबरला दुपारी फिरायला आला होता. डोंबिवलीच्या भगवान काठे नगर परिसरात हे कुटूंब राहते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते राणीच्या बागेत फिरावयास गेले. तेथे आरव त्याच्या चुलतबहिणीबरोबर खेळत होता. तेव्हा कोणीतरी व्यक्तीने त्याला फूस लावून तेथून पळवून नेले. त्याचे काका संदीपकुमार राणा यांना हे कळताच त्यांनी जवळच असलेल्या भायखळा पोलीसठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांनी आपल्या पुतण्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदवला.

गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे यांच्या पथकाने आरवचा तपास चालू केला. सर्व पोलीसठाण्यांना याबाबतची सूचना देण्यात आली. याच तपासात पोलिसांना आरव आझाद मैदान परिसरात एकटाच भांबावलेल्या अवस्थेत मिळून आला. संध्याकाळ होईपर्यंत आरव सापडल्यामुळे त्याच्या परिवाराने सुटकेचा निःश्वास टाकला. भायखळा पोलीसठाण्याशी संपर्क साधला असता तेथील उपस्थित अधिकाऱ्याने आरव फिरतफिरत सीएसएमटी परिसरात पोहोचल्याचे सांगितले. मात्र, जाणकारांच्या माहितीनुसार पळवणाऱ्या व्यक्तीने आरवला सीएसएमटी रेल्वेस्थानकाकडे नेले होते. परंतु, पोलीस शोध घेत असल्याचे लक्षात आल्यामुळे आरोपीने आरवला एकटेच सोडून पोबारा केला.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content